एकाच हाॅटेलचे २१ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; नियमांचे सर्रास उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:36 PM2021-02-21T23:36:00+5:302021-02-21T23:36:10+5:30

संपर्कात आलेल्या असंख्य ग्राहकांचा शोध घेणे अवघड : नियमांचे सर्रास उल्लंघन

21 employees of the same hotel corona positive | एकाच हाॅटेलचे २१ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; नियमांचे सर्रास उल्लंघन

एकाच हाॅटेलचे २१ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; नियमांचे सर्रास उल्लंघन

Next

मीरा रोड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आता मीरा- भाईंदर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली असून, वरसावे नाका, घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन या हॉटेलमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने पालिकेने सील केले आहे. या हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या असंख्य ग्राहकांचा शोध घेणे अवघड होणार आहे. 

मीरा - भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण मध्यंतरीच्या काळात कमी झाल्यानंतर महापालिका व पोलीस प्रशासनाकडूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे बंद झाले. दुसरीकडे बेशिस्त नागरिकांसह अनेक नगरसेवक, राजकारणीही सर्रास नियमांचे उल्लंघन करत विनामास्क वावरत आहेत. त्यातूनच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच नेहमी गर्दी असणाऱ्या वरसावे नाका, घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन या बड्या हॉटेलातील २१ कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले. त्यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिकेचे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी १८ फेब्रुवारीपासून ४ मार्चपर्यंत हॉटेल इमारतच सील केली आहे. तसे आदेश त्यांनी  हॉटेलच्या दर्शनी भागात लावले आहेत. 

या घटनेने खळबळ उडाली असून, या हॉटेलात रोज येणाऱ्या असंख्य ग्राहकांना शोधणे अवघड झाले आहे. कारण कोरोनाग्रस्त हॉटेल कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सरकारचे हॉटेल व कर्मचाऱ्यांसाठी दिलेले निर्देश अतिशय स्पष्ट असले तरी त्याचे काटेकोर पालन केले जात नाहीत.

Web Title: 21 employees of the same hotel corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.