शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१२ तासांत लिहिल्या २०७ कविता; दिनेश गुप्ता यांची अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:54 IST

गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.

कल्याण : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देश हळहळला. ही हळहळ एखाद्या कविमनाला कशी हेलावून टाकते, त्याच्यातील संवेदनशील मन कसे काय त्याला बोलते करते, याचा उत्तम प्रत्यय प्रा. दिनेश गुप्ता यांच्या रूपाने आला. गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.सार्वजनिक वाचनालयातर्फे ‘काव्यलेखनाची काव्यमय श्रद्धांजली’ या कार्यक्रमांतर्गत गुप्ता यांनी हा विक्रम केला आहे. अटलजी कवी असल्याने त्यांना समर्पक व साजेशी ही आदरांजली वाहण्यात आली. वाजपेयी यांच्या कविता प्रेरणादायी व आशादायी विश्वास निर्माण करणाऱ्या होत्या. अटलजींच्या ‘हार नही मानूंगा’ व ‘विश्वासअटल’ या कवितेतील काही शब्दांमुळे गुप्ता यांना प्रेरणा मिळाली. त्यातून त्यांनी २०७ कविता रचल्या. कविता करताना एखादा विषय घेऊन कविता न करता समोर येईल तो विषय, असे मानून त्यांनी कविता केल्या. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत काम करणारी व्यक्ती समोर आली, तरी त्यांनी त्याच्यावर कविता रचली. या विक्रमासाठी कोणतीही पूर्वतयारी गुप्ता यांनी केली नव्हती. यापूर्वी त्यांनी ९ आॅगस्टला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ८० कविता लिहिल्या होत्या. हा अनुभव गाठीशी असल्याने १२ तासांचा काव्यलेखनाचा प्रपंच करण्याचा त्यांचा मानस होता. तो त्यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात आणला.गुप्ता यांच्या या विक्रमाची नोंद गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा विक्रम नोंदवण्यासाठी या रेकार्डचे अधिकारी आलोककुमार सार्वजनिक वाचनालयात आले होते. गुप्ता यांना त्यांनी गोल्डन बुक आॅफ रेकार्डचे प्रमाणपत्र बहाल केले.‘अटलविश्वास’ प्रकाशित करण्याचा मानसगुप्ता हे ४० वर्षांपासून कविता लिहित आहेत. २०७ कविता लिहिताना गुप्ता यांनी केवळ १५ मिनिटांचा ब्रेक घेतला. या कविता ‘अटलविश्वास’ या काव्यसंग्रहाच्या नावाने प्रकाशित केल्या जाणार आहेत. त्याला प्रकाशक मिळताच त्याचे प्रकाशन यथोचित समारंभात केले जाईल, असे गुप्ता यांनी त्यावेळी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यू