शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा २० हजार नळजोडण्या!

By admin | Updated: February 6, 2016 02:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू आहे. त्यामुळे पाण्याची बिले वेळेत भरणाऱ्या ग्राहकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे

मुरलीधर भवार,  डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू आहे. त्यामुळे पाण्याची बिले वेळेत भरणाऱ्या ग्राहकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. त्याच वेळी साधारण २२ टक्के पाण्याची चोरी किंवा गळती होते, अशी स्थिती आहे. पण, हा अंदाजही १८ वर्षांपूर्वीचा आहे. वस्तुत: ही चोरी आटोक्यात आणली तर सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. १८ वर्षांत या चोरीचे आॅडिटच न झाल्याने फुकट्यांची, पाणी चोरणाऱ्यांची चंगळ सुरू आहे आणि दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून त्यांच्यावर कारवाईसाठी सत्ताधारी पक्ष आग्रही असूनही पालिकेने मात्र मौन बाळगले आहे. पाणीचोरांविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या सेना सदस्यांनी मनपा क्षेत्रात जवळपास २० हजार बेकायदा नळजोडण्या असल्याचा दावा केला आहे. पण, पालिकेने मात्र पाणीचोरी होतच नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. मनपा क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र्र धरणात पाणीसाठा कमी असल्याने सध्याच्या पाणीकपातीत वाढ होऊन शनिवार-रविवारी पाणीपुरवठा बंद राहील. पालिकेने २५ कोटींच्या टंचाईच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यात बोअरवेल दुरुस्ती, विहिरी स्वच्छ करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर आहे. पण, पाणीचोरांवर कारवाईचा कोणताही आराखडा नाही. २० हजार बेकायदा नळजोडण्यांचा दावा खरा मानला, तर साधारण ४० हजार कुटुंबे सध्या फुकटचे पाणी वापरत आहेत. त्यातून महिन्याला जवळपास चार ते पाच कोटी रुपयांचा महसूल बुडतो.पाणीचोरीविरोधात आवाज उठवून सातत्याने पाठपुरावा करणारे सेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी यासाठी २०१० पासून पाच वेळा उपोषण केले. त्यानंतर, खोटी कागदपत्रे सादर करून नळजोडण्या घेतल्याप्रकरणी ९८ गुन्हे दाखल झाले. यात, १२ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. पुढे बेकायदा नळजोडण्यांवरील कारवाई थंडावली. त्यांच्याशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने चोरांचे फावल्याचा आरोपही झाला. अर्धा इंची बेकायदा नळजोडणीसाठी अधिकारी २५ हजार, तर एक इंची नळजोडणीसाठी ५० हजार रुपये घेतात, असा म्हात्रे यांचा आरोप आहे. पालिका क्षेत्रात पाणीचोरी होत नसून तशी तक्रार मनपाकडे आली नसल्याची लेखी माहितीच म्हात्रे यांना दिली आहे.पाणीपुरवठा शनिवार आणि रविवारी बंद राहणार असल्याने त्या काळात टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही, असे प्रभाग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखड्यानुसार १५ टँकरच्या प्रत्येक प्रभाग क्षेत्रात १० हजार लीटर क्षमतेच्या पाच फेऱ्या होतात. मात्र, ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, त्याच दिवशी टँकर मिळणार नसेल; तर इतर दिवशी टँकरने पाणीपुरवठा करून काय उपयोग, असा महिलांचा सवाल आहे.