‘एकवीरा’च्या कोळी यांना २० हजारांचा दंड
By Admin | Updated: March 20, 2017 02:03 IST2017-03-20T02:03:18+5:302017-03-20T02:03:18+5:30
ग्राहकाकडून सदनिकेचे पैसे स्वीकारूनही त्याला करारानुसार सदनिकेचा ताबा न देणाऱ्या एकवीरा एंटरप्रायजेसच्या धनंजय कोळी

‘एकवीरा’च्या कोळी यांना २० हजारांचा दंड
ठाणे : ग्राहकाकडून सदनिकेचे पैसे स्वीकारूनही त्याला करारानुसार सदनिकेचा ताबा न देणाऱ्या एकवीरा एंटरप्रायजेसच्या धनंजय कोळी यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच ग्राहकाकडून घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले.
शालिनी संतोष यांनी कोळी यांच्या कुडूस येथील प्रकल्पातील एक सदनिका १२ लाख ४७ हजारांना घेण्याचे ठरवून २० मे २०१४ रोजी साठेखत करार केला. शालिनी यांनी कोळी यांना आधी ७ लाख ११ हजार आणि नंतर ३ लाख ८९ हजार १८० रुपये हप्त्याने दिले. नंतर, कोळी यांनी सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा आणि सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. साठेकरारानुसार जानेवारी २०१५ पर्यंत सदनिकेचा ताबा देण्याचे त्यांनी मान्य केले होते. परंतु, इमारतीचेच बांधकाम पूर्ण झाले नव्हते. तर, जानेवारी २०१६ मध्ये इमारतीचे आणि सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसल्यावर शालिनी यांनी उर्वरित रक्कम देऊन ताबा मिळावा, यासाठी कोळी यांना कुरिअरद्वारे नोटीस पाठवली. मात्र, नोटीस मिळूनही त्यांनी सदनिकेचा ताबा दिला नाही. त्यामुळे शालिनी यांनी कोळी यांच्याविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)