शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २ हजार ८६९ नव्या कोरोना बाधितांची वाढ, ५३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 21:44 IST

जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील ७३२ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे येथील रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६५३ झाली.

ठाणे- जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत शनिवारी दोन हजार ८६९ रूग्णांची वाढ झाली. यामुळे रुग्ण संख्या आता चार लाख ७० हजार ५० झाली आहे. तर आज ५३ जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा आता सात हजार ६४३ वर पोहोचला आहे. (2 thousand 869 new corona cases increased in Thane district on Saturday, 53 people died)

जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील ७३२ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे येथील रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६५३ झाली. या शहरात ९ जणांच्या मृत्यूने एक हजार ६८१ मृतांची नोंद झाली. याप्रमाणेच कल्याण डोंबिवलीत ८२२ रुग्णांच्या वाढीमुळे या महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या एक लाख २१ हजार ५४२ नोंदली गेली आहे. आजही या शहरात ११ जणांचा मृत्यू झाल्याने येथील मृतांची संख्या एक हजार ४४५ झाली. 

उल्हासनगरला ११० रुग्णांसह चार मृतांची आज वाढ झाली. या शहरात आता १८ हजार ९४९ रुग्णांची व ४३४ मृतांची नोद झाली. भिवंडी मनपा क्षेत्रातही २२  रुग्णांमुळे आता नऊ हजार ८७२ रुग्णांची नोंद झाली. दोन मृत्यू झाल्याने ३९१ मृत्यू कायम आहे. मीर भाईंदरला ३५९ रुग्णाची आज वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या ४३ हजार ९२७ नोंद केली. आज दहा रुग्णांच्या मृत्यूने आतापर्यंत एक हजार ४१ मृतांची नोंद झाली.

अंबरनाथला १३२ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १७ हजार ८४५ झाली. या शहरात पाच मृत्यू झाले असता ३८६ एकूण मृतांची नोंद झाली. कुळगांव बदलापूरला १४८ रुग्ण वाढीने १८ हजार ६५६ रुग्णांची नोंद झाली. दोघांच्या मृत्यूने येथील मृतांची संख्या १९४ झाली. याशिवाय जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये आज १६३ रुग्णांची वाढ होऊन एकूण २६ हजार ७८२ रुग्णांची नोंद केली. या गांवपाड्यांमध्ये आज दोन जणांच्या मृत्यूने आजपर्यंत ६९४ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस