डेंग्यूचे आणखी २ संशयित
By Admin | Updated: November 9, 2016 06:00 IST2016-11-09T06:00:17+5:302016-11-09T06:00:17+5:30
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी डेंग्यूचे पाच संशियत रु ग्ण आढळले असतानाच मंगळवारी त्यात आणखी दोघांची भर पडली

डेंग्यूचे आणखी २ संशयित
म्हारळ : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी डेंग्यूचे पाच संशियत रु ग्ण आढळले असतानाच मंगळवारी त्यात आणखी दोघांची भर पडली. त्यामुळे या रुग्णांची संख्या सात झाली आहे. स्वच्छतेचाअभाव, परिसरातील उघड्या गटारांकडे दुर्लक्ष तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका ठोस उपाययोजना राबत नसल्याचा आरोप आधारवाडीतील रहिवाशी करीत आहेत.
त्रिवेणीधारा सोसायटीत डेंग्यूच्या संशियत रु ग्णांची संख्या चार झाली आहे. याच सोसायटीतील अन्य दोघे अमित पाटील व सुमित पाटील यांच्या रक्तचाचणीचा अहवाल येणे बाकी आहे. तर रिचा राणे (१४) व उत्कर्षा आसवले (१८) यांना डेंग्यूची लागण झाली आहे.
यामुळे रहिवाशांनी घरातील झाडांच्या कुंड्या काढून टाकल्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने डेंग्यूबाधित कुटुंबातील सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
परिसरात वेळेवर कचरा उचला जात नसल्याने व डास प्रतिबंधक उपाययोजना महापालिका प्रशासन राबवत नसल्याने रहिवाशांच्या संतप्त प्रतिक्रि या उमटत आहेत.