उल्हासनगरात आज १९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण; तर एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 18:29 IST2020-08-27T18:29:37+5:302020-08-27T18:29:52+5:30
एकूण कोरोना रुग्णाची संख्या ७६६८

उल्हासनगरात आज १९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण; तर एकाचा मृत्यू
उल्हासनगर : महापालिका हद्दीत आज नवे १९ रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला. एकून मृतांची संख्या २२० झाली असून आज ७ जणांनी कोरोनावर मात केली. एकून कोरोना रुग्णाची संख्या ७६६८ तर एकून कोरोना मुक्त रुग्णाची संख्या ७१०४ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या एकून पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ३३४ आहे. त्यापैकी महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालय व कोविड सेंटर मध्ये १६०, होम आयलोशन मध्ये ६६, तर शहारा बाहेरील रूग्णालयात ११८ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के आहे. कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याने महापालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.