ठाण्यात १८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 20:59 IST2021-08-09T20:59:43+5:302021-08-09T20:59:53+5:30

भिवंडी परिसरात तीन रुग्ण आणि मृत्यू नाही. मीरा भाईंदरला १२ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यू नाही. अं

183 new corona cases registered in Thane; Six people died | ठाण्यात १८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; सहा जणांचा मृत्यू

ठाण्यात १८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; सहा जणांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकां, गावपातळीवर १८३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचा मृत्यू सोमवारी झाला आहे. ठाण्यात ४९ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. कल्याण डोंबिवलीला २९ रुग्ण वाढीसह एक मृत्यू झाले. उल्हासनगरमध्ये तीन रुग्ण वाढ झाली असून दोन मृत्यू झालेत.

भिवंडी परिसरात तीन रुग्ण आणि मृत्यू नाही. मीरा भाईंदरला १२ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यू नाही. अंबरनाला नऊ रुग्ण वाढले असून मृत्यू नाही. बदलापूरमध्ये १६ रुग्णांची आज वाढ असून मृत्यू नाही. तर जिल्ह्यातील गांवपाड्यात ११ रुग्ण सापडले असून मृत्यूची नोंद नाही.

Web Title: 183 new corona cases registered in Thane; Six people died