शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

करंजा बंदराचा १८ वर्षांचा वनवास संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 5:17 AM

सुमारे १८ वर्षांपासून रखडतरखडत चाललेल्या करंजा या मच्छीमार बंदराच्या विकासाच्या मार्गातील निधीच्या कमतरतेचा मुख्य अडसर आता दूर झाला आहे. राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने यासाठी आवश्यक असलेल्या १४९ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस ६ आॅगस्ट २०१८ रोजी मान्यता दिली आहे.

- नारायण जाधवठाणे - सुमारे १८ वर्षांपासून रखडतरखडत चाललेल्या करंजा या मच्छीमार बंदराच्या विकासाच्या मार्गातील निधीच्या कमतरतेचा मुख्य अडसर आता दूर झाला आहे. राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने यासाठी आवश्यक असलेल्या १४९ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस ६ आॅगस्ट २०१८ रोजी मान्यता दिली आहे. यामुळे या मच्छीमार बंदराचा वनवास आता संपणार असून येत्या दोनतीन महिन्यांत या बंदरावर नव्या जेट्टीसह इतर कामे सुरू होतील. यात केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा निम्मा राहणार आहे.मुंबईत ससून डॉक व भाऊचा धक्का येथील कसारा ही बंदरे आहेत. यात कसाराबंदर आधीच गुजराती मच्छीमारांना सरकारने आंदण दिले आहे. यामुळे रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबईतील मच्छीमारांसाठी ससून डॉक हे एकमेव बंदर आहे. त्या ठिकाणच्या हजारो बोटी ससून डॉक येथे इंधन भरण्यासह बर्फ घेण्यास येतात. त्यासाठी करंजाबंदर विकसित होणे गरजेचे होते. करंजा रायगड जिल्ह्यातील मुंबई आणि नवी मुंबईला जवळ असणारे एक प्रमुख बंदर म्हणून ओळखले जात असून येथील मच्छीमारांकडून मोठ्या प्रमाणात मासळी या निधीतूनजेट्टी, लिलावगृह, शेड, मासळी सुकवणे, वर्गीकरण करणे यासाठी फलाटांचे बांधकाम करण्यात येणार आहे. इंधन भरण्याची सोय, बर्फ साठवणगृह आदी येथे बांधण्यात येणार आहे. मात्र, यासाठी विविध खात्यांची मान्यता, निधीची कमतरता, बांधकाम सुरू असताना खडक लागणे, डिझाइनमधील बदल यामुळे करंजाबंदराचे काम रखडले होते.हजारो मच्छीमारांना होणार फायदाकरंजा हे प्रमुख बंदर असून याठिकाणी आमच्या संस्थेच्या सव्वाचारशे सभासदांसह तालुक्यात ८०० च्या वर मच्छीमार बांधवांना नव्या जेट्टीचा फायदा होणार आहे.शिवाय मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील अनेक बोटी येथे इंधन भरणे, बर्फ घेण्यास येणार आहेत. आता निधी मिळाल्याने मच्छीमारांची मोठी अडचण दूर होणार आहे.साधारणत: पावसाळा संपल्यावर आॅक्टोबरमध्ये नव्या जेट्टीच्या बांधकामास सुरुवात होऊ शकते, अशी माहिती करंजा मच्छीमार सेवा संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांनी ‘लोकमत’ला दिली.१५० कोटींच्या निधीस मिळाली मान्यता : आॅक्टोबरमध्ये काम सुरू करण्याचा संकल्पअसा आहे बंदर विकासाच्या निधीमान्यतेचा प्रवास२००० साली कोकण विकास कार्यक्रमांतर्गत करंजाबंदराच्या बांधकामास मान्यता, तर २००४ साली निधीस प्रशासकीय मान्यता२००५ साली केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील हे काम केंद्र पुरस्कृत निधीतून करण्याचे ठरले२०११ साली ७७ कोटी ७३ लाख ४७ हजारांच्या निधीस प्रशासकीय मान्यताबंदराचे काम करताना खडक लागल्याने आणि जेट्टीच्या डिझाइनमध्ये बदल झाल्याने खर्च वाढला. यामुळे २०१६ साली २५३ कोटी ९६ लाखांचा सुधारित प्रकल्प आराखडा मंजुरीसाठी पाठवला.सुधारित आराखड्यास केंद्राने राज्य आणि केंद्र मिळून फिप्टीफिप्टी हिस्सा राहील, या तत्त्वावर मार्च २०१८ मध्ये १४९ कोटी ८० लाखांच्या आराखड्यास मंजुरी दिली. ती देताना पूर्वी झालेला नऊ कोटी ३३ लाखांचा खर्च वगळला.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या