उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान, अंगणवाडी सेविका, वैधकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनाही बोनस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:56 IST2025-10-14T17:56:08+5:302025-10-14T17:56:31+5:30
Ulhasnagar Municipal Corporation News: महापालिका स्थायी समिती सभागृहात अधिकारी व कामगार संघटनेच्या नेत्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर ऐकरक्कमी १८ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचे आयुक्तांनी मंगळवारी जाहीर केले. आयुक्तांच्या निर्णयानंतर कामगारांनी आनंद व्यक्त केला असून यामुळे महापालिकेवर साडे तीन कोटींचा जादाचा आर्थिक भार पडणार आहे.

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान, अंगणवाडी सेविका, वैधकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनाही बोनस
उल्हासनगर - महापालिका स्थायी समिती सभागृहात अधिकारी व कामगार संघटनेच्या नेत्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर ऐकरक्कमी १८ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचे आयुक्तांनी मंगळवारी जाहीर केले. आयुक्तांच्या निर्णयानंतर कामगारांनी आनंद व्यक्त केला असून यामुळे महापालिकेवर साडे तीन कोटींचा जादाचा आर्थिक भार पडणार आहे.
उल्हासनगर महापालिकेची आर्थिकस्थिती डबघाईला आली असून ठेकेदारांची एकूण ८० कोटी देणी बाकी आहे. मंगळवारी स्थायी समिती सभागृहात आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार दिवाळी बोनसच्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे यांच्यासह कामगार संघटनेचे नेते श्याम गायकवाड, चरणसिंग टाक, दिलीप थोरात आदी नेते उपस्थित होते. बैठकीत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड जाण्यासाठी १८ हजार रुपये दिवाळी (बोनस) सानुग्रह अनुदान सर्वानुमते घोषित केले. दिवाळी सानुग्रह अनुदानाचा लाभ महापालिकेतील एकून २ हजार कामगाराना मिळणार आहे. दिवाळीपूर्वी कामगारांच्या बँक खात्यात दिवाळी बोनस रक्कमेसह वेतन देण्याचा मानस मुख्य लेखा अधिकारी भिल्लारे यांनी व्यक्त केला. दिवाळी सानुग्रह अनुदानामुळे महापालिकेवर साडे तीन कोटीचा बोजा पडणार आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे ठेकेदारांची दिवाळी यावर्षी कोरडी जाणार असल्याचे बोलले जाते. महापालिका कामगारा बरोबरच आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी महापालिका अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना २ हजार १०० रुपये, वैधकीय अधिकाऱ्यांना १० हजार तर हेल्थ वर्कस यांना ५ हजार दिवाळी बोनस यांना जाहीर केली. तसेच महापालिका आस्थापनात तब्बल ऐक हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून त्यांनाही नियमनुसार सबंधित ठेकेदारांनी दिवाळी बोनस द्यावा. असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आ