शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कुरिअरमध्ये ड्रग्जच्या नावाने १७ लाखांचा गंडा; कापूरबावडी पाेलिस ठाण्यात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:47 IST

या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे कापूरबावडी पाेलिसांनी बुधवारी सांगितले...

ठाणे : आम्ही नार्काेटिक्स विभागातील पाेलिस असल्याची बतावणी करीत तैवान देशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये एमडी ड्रग्ज सापडल्याचा दावा करीत काही सायबर भामट्यांनी ३१ वर्षीय महिलेला १७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच घडला.

ठाण्याच्या ढाेकाळी भागात राहणाऱ्या तक्रारदार महिलेला ६ सप्टेंबर २०२४ राेजी अनोळखी महिलेने माेबाईलवरून काॅल केला. या काॅलद्वारे तिला तुम्ही तैवान देशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये एमडी आणि एमए  ड्रग्ज सापडल्याचा दावा केला. तुमच्या विराेधात  नार्कोटिक्स विभागात पोलिस तक्रार झाल्याचे तिला सांगण्यात आले. त्यानंतर अन्य एकाने नार्काेटिक्स  डिपार्टमेंटमधून पाेलिस बाेलत असल्याचा दावा करीत व्हेरिफिकेशनसाठी स्काईप हे ॲप  डाउनलोड करण्यास या महिलेला  सांगितले. 

कर्ज घेण्यास भाग पाडलेकायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी तक्रारदार महिलेला आयसीआयसीआय बँक खात्यातून १७ लाखांचे कर्ज घेण्यास भाग पाडले.  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने १५ ऑक्टाेबर २०२४ रोजी तक्रार दिली आहे. 

परदेशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ तसेच इतर आक्षेपार्ह सामान  मिळाल्याने पोलिस केस झाली आहे.  याबाबत फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. तसेच बँक डिटेल आणि इतर खाजगी माहिती अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये. अनोळखी कॉल, व्हिडीओ कॉल रिसिव्ह करू नका. त्याचबराेबर  कोणत्याही वेबसाईट तसेच ॲप लिंक क्लिक करू नये.              - शैलेश साळवी,             वरिष्ठ पाेलिस निरीक्षक,         जनसंपर्क अधिकारी ठाणे  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस