दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात १७ गोविंदा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 20:37 IST2019-08-24T20:36:31+5:302019-08-24T20:37:49+5:30
जायबंदी झालेले गोंविदा हे सर्वात जास्त नौपाडा, विष्णूनगर येथे थर लावता जखमी झाले आहे.

दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात १७ गोविंदा जखमी
ठाणे - शहरात दहीहंडी उत्सवासाठी आलेल्या ठाणे - मुंबईतील गोंविदा पथक मानवी मनोरे उभारताना घसरून पडले. त्यात १७ जण जायबंदी झाले असून त्यामध्ये एक तरुणीचा समावेश आहे. नऊजण हे मुंबईतील जोगेश्वरी, मालाड आणि मुलुंड येथील आहे. जायबंदी झालेले गोंविदा हे सर्वात जास्त नौपाडा, विष्णूनगर येथे थर लावता जखमी झाले आहे.
मुलुंड येथील सुजय भेरेकर (26), राहुल पेलान (27), ठाणे आनंदनगर येथील कुणाल यादव (10), मालाडची रकक्षा भगत (19) आणि जोगेश्वरी येथील महेश धुरी (24), योगेश देसाई (19), संकल्प पवार (21) विवेक कोचरेकर (32) विपुल सिंग (24) अविनाश वारिक (23)अभिषेक अदाते(25), संतोष पवार (30) आणि सुशांत थोरात (20) तसेच ठाण्यातील सतीष जाधव (35 ) अशी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतलेल्या जखमी गोविंदांची नावे असून ठामपा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेऊन तिघांना सोडले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ठाण्यात १७ जण जखमी झाले असून १४ जणांवर जिल्हा तर ३ जणांवर ठामपाच्या छत्रपती शिवाजी महाराज उपचार करुन घरी सोडले आहे. बहुतांश गोंविदा किरकोळ जखमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.