चोरीला गेलेले 165 मोबाईल नागरिकांनी केले परत; अंबरनाथ पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 19:51 IST2019-12-13T19:51:00+5:302019-12-13T19:51:07+5:30
अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर हद्दीतून विविध ठिकाणी चोरीला गेलेले तब्बल 165 मोबाईल संबंधित नागरिकांना समारंभात देण्यात आले.

चोरीला गेलेले 165 मोबाईल नागरिकांनी केले परत; अंबरनाथ पोलिसांची कामगिरी
अंबरनाथ - अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर हद्दीतून विविध ठिकाणी चोरीला गेलेले तब्बल 165 मोबाईल संबंधित नागरिकांना समारंभात देण्यात आले. मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अंबरनासह विविध भागातून गेल्या काही महिन्यांपासून चोरीला गेलेल्या मोबाईलचा पोलिसांच्या मोबाईल चोरी विरोधी पथकाने छडा लावला.
अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, डी. डी. नरळे आदींच्या हस्ते येथील बिग सिनेमाच्या सभागृहात देण्यात आले. यामध्ये उल्हासनगरच्या हद्दीतील 99 आणि अंबरनाथ हद्दीतील 66 मोबाईल असे मिळून अंदाजे 16 लाख 61 हजारांचे मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले.
चोरीला गेलेले मोबाईल पुन्हा मिळणार असल्याचे समजल्यावरून नागरिकांची झुंबड उडाली होती. मोबाईल चोरीला कसा गेला याची आठवण करा आणि तो परत चोरीला जाणार नाही याची खबरदारी घ्या, नागरिकांचा गेलेला मुद्देमाल त्यांना त्वरित परत करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते, त्यानुसार मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले, असे उपयुक्त प्रमोद शेवाळे यांनी सांगितले.