शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

ठाण्यात परवडणारी १६ हजार घरे; मुख्यमंत्र्यांकडून दिवाळीची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 06:40 IST

किसन नगर, हाजुरी, टेकडी बंगला येथे महाप्रितच्या माध्यमातून क्लस्टर विकास

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील किसन नगर, हाजुरी तसेच टेकडी बंगला परिसरातील ४२.९६ हेक्टर परिसराचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करून १६ हजार ५७८ घरे उभारली जाणार आहेत. महाप्रितमार्फत समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून ही परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

रहिवाशांना सध्याचे हक्काचे घर रिकामे न करता नव्याने मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये हक्काचे घर प्राप्त होणार आहे. या क्लस्टर योजनेला पहिल्या टप्प्यात सिडकोच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. 

धोकादायक इमारतीतील रहिवाशांना लाभ nमहाप्रितच्या माध्यमातून टेकडी बंगरा, हाजुरी आणि किसन नगर ५ आणि ६ येथील क्लस्टरसाठी निधी उभा करण्याच्या प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. nया प्रकल्पासाठी ६,०४९ कोटींचा खर्च केला जाणार आहे. ठाण्यातील किसन नगर यूआरपीमधील ५ व ६ यूआरसी, टेकडी बंगला आणि हाजुरी येथील क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रकल्प तीन वर्षांत हाेणारघर उभारणीचा कालावधी हा साधारपणे ३ वर्षांचा गृहीत धरलेला आहे. तातडीने सल्लागार नियुक्त केला जाणार असून, त्यानंतर येथील प्लान तयार करून नकाशे मंजूर करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित अर्थात ‘महाप्रित’च्या माध्यमातून शासकीय भूखंड ताब्यात घेतले जात आहेत. त्यात कृषी भूखंड १.९३ हेक्टर (६० टक्के पुनर्वसन व ४० टक्के व्यावसायिक वापर), बुश इंडिया कंपनीचा भूखड २.२३ हेक्टर (१०० टक्के पुनर्वसन) असे एकूण ४.१६ हेक्टर भूखंडावर ५,०४७ पुनर्वसन सदनिका बांधल्या जाणार आहेत. ७९ हजार १०६ चौरस मीटर चटई क्षेत्र विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. पुनर्वसन सदनिकांसाठी ३,०८६ कोटी आणि पायाभूत सुविधांसाठी २,९६३ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. 

येथे होणार क्लस्टर   यूआरसी   अंदाजित क्षेत्रफळ     घरांचे पुनर्वसन  टेकडी बंगला ६          १              ४.१७ हेक्टर            १२५७हाजुरी ११                  १    १०.७६    १८९१किसन नगर १२    ५,६     २८.०३                 १३४३०एकूण                      -            ४२.९६ हेक्टर        १६,५८७ 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे