बेकायदा हुक्का पार्लरवरील धाडीत १६ जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST2021-06-16T04:52:21+5:302021-06-16T04:52:21+5:30

मीरारोड : घोडबंदर मार्गावरील हॉटेल चेना गार्डन या ठिकाणी सर्रासपणे चालणारे हुक्का पार्लर पोलिसांनी धाड टाकून उद्ध्वस्त केले. ग्राहकांसह ...

16 arrested in raid on illegal hookah parlor | बेकायदा हुक्का पार्लरवरील धाडीत १६ जण अटकेत

बेकायदा हुक्का पार्लरवरील धाडीत १६ जण अटकेत

मीरारोड : घोडबंदर मार्गावरील हॉटेल चेना गार्डन या ठिकाणी सर्रासपणे चालणारे हुक्का पार्लर पोलिसांनी धाड टाकून उद्ध्वस्त केले. ग्राहकांसह हॉटेल कर्मचारी मिळून सोळा जणांना अटक केली आहे.

सहायक पोलीस आयुक्त विलास सानप व काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सोमवारी चेन्नई गार्डन या हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी सदर हॉटेलमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करून, बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून आले. घटनास्थळावरून ११ हजार रुपयांचे हुक्का साहित्य व तंबाखू जय हुक्का फ्लेवर, तसेच २ हजार ९०० रुपये किमतीचे विदेशी मध्य पोलिसांनी जप्त केले आहे. हॉटेल मालक तरविंदर किर, व्यवस्थापक चार्ल्स कुला, ३ बेटर व ११ ग्राहकांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: 16 arrested in raid on illegal hookah parlor