उल्हासनगर महापालिकेत ५ महिन्यात १५३ कोटीच्या कामाचे प्रस्ताव, मात्र उत्पन्नचे ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 17:39 IST2021-08-28T17:39:40+5:302021-08-28T17:39:57+5:30

 महापालिकेच्या विविध विभागातील विकास कामासाठी गेल्या पाच महिन्यात १५३ कोटीच्या कामाचे प्रस्ताव आले. तर दुसरीकडे पाच महिन्यात मालमत्ता कर विभागाकडून २३ कोटी व नगररचनाकार विभागाकडून ११ कोटी असे एकून ३५ कोटीचे उत्पन्न आले आहे

153 crore work proposal in 5 months in Ulhasnagar Municipal Corporation, but the income is stagnant | उल्हासनगर महापालिकेत ५ महिन्यात १५३ कोटीच्या कामाचे प्रस्ताव, मात्र उत्पन्नचे ठणठणाट

उल्हासनगर महापालिकेत ५ महिन्यात १५३ कोटीच्या कामाचे प्रस्ताव, मात्र उत्पन्नचे ठणठणाट

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेत उत्पन्नाचा ठणठणाट असतांना गेल्या पाच महिन्यात विविध विभागातील १५३ कोटीच्या कामाचे प्रस्ताव आले. तर उत्पन्न ३५ कोटीच्या आत आहे. यामध्ये बांधकाम व पाणी पुरवठा विभागाने आघाडी घेतली असून आयुक्तांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. 

उल्हासनगर महापालिकेच्या कारभारावर आमदानी अठ्ठानी, खर्चा रुपया, अशी टीका होत असताना, गेल्या पाच महिन्यात १५३ कोटीच्या कामाचे प्रस्ताव आले. याप्रकारने महापालिकेच्या कारभारावर सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली. महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मुख्य लेखाअधिकारी विकास चव्हाण, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, विरोधीपक्षनेते किशोर वनवारी आदींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात बांधकाम विभागात ९८ कोटीच्या विकास कामाचे प्रस्ताव आले. त्यापाठोपाठ पाणी पुरवठा विभाग २९ कोटी, विधुत विभाग ८ कोटी, वाहन विभाग २ कोटी, नागरी आरोग्य केंद्र २ कोटी ६० लाख, वैधकीय आरोग्य विभाग ७ कोटी असे एकून १५३ कोटीच्या विकास कामाचे प्रस्ताव विविध विभागात आले आहे.

 महापालिकेच्या विविध विभागातील विकास कामासाठी गेल्या पाच महिन्यात १५३ कोटीच्या कामाचे प्रस्ताव आले. तर दुसरीकडे पाच महिन्यात मालमत्ता कर विभागाकडून २३ कोटी व नगररचनाकार विभागाकडून ११ कोटी असे एकून ३५ कोटीचे उत्पन्न आले आहे. उत्पन्न व खर्चातील तफावत दूर करण्यासाठी आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी वेळीच विकास कामाच्या प्रस्तावावर नियंत्रण ठेवले नाहीतर, महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले. याबाबत मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्यासी संपर्क साधला असता, विविध विभागातील विकास कामाचे प्रस्ताव आले असल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. दरम्यान नागरी आरोग्य केंद्राचा ठेकेदार व सल्लागार एकच असल्याची चर्चाही महापालिकेत रंगली आहे.

Web Title: 153 crore work proposal in 5 months in Ulhasnagar Municipal Corporation, but the income is stagnant