उल्हासनगरात बंद घरातून १५ लाखाची चोरी, ३ बॅगेतील रक्कम लंपास
By सदानंद नाईक | Updated: November 19, 2022 19:35 IST2022-11-19T19:35:38+5:302022-11-19T19:35:59+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील शिवनयना पॅलेस इमारती मध्ये ट्रान्सफोर्टचा व्यवसाय करणारे जगजितसिंग संधू कुटुंबासह राहतात

उल्हासनगरात बंद घरातून १५ लाखाची चोरी, ३ बॅगेतील रक्कम लंपास
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील शिवनयना पॅलेस इमारती मध्ये राहणाऱ्या जगजितसिंग संधू यांच्या बंद घराच्या बेडरूम मध्ये चोरट्याने प्रवेश करून तीन बॅगेत ठेवलेली १५ लाखाची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील शिवनयना पॅलेस इमारती मध्ये ट्रान्सफोर्टचा व्यवसाय करणारे जगजितसिंग संधू कुटुंबासह राहतात. १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घर बंद असताना अज्ञात चोरट्याने बेडरूम मध्ये खिडकीची काच तोडून त्यावाटे प्रवेश केला. बेडरूम मध्ये तीन बॅगेत ठेवलेली १५ लाखाची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. चोरीचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघड झाल्यावर संधू यांना धक्का बसला. त्यांनी मध्यवर्ती पोलिस ठाणे गाठून पोलिसांना चोरीची माहिती दिल्यावर, पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.