मीरारोडमधून १५ बांगलादेशींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 14:36 IST2020-10-31T14:36:11+5:302020-10-31T14:36:50+5:30
Miraroad News : मीरारोडच्या रसाज शॉपिंग सेंटर समोरील चौकात आणि रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉक खाली बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत आहेत

मीरारोडमधून १५ बांगलादेशींना अटक
मीरारोड - मीरारोडमधून देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १५ बांगलादेशीनापोलिसांनी अटक केली असून नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे सह कदम, चासकर, पाटील, आसवले, ढेमरे, यंबर, चव्हाण, शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली आहे.
हंडोरे यांना माहिती मिळाली की, मीरारोडच्या रसाज शॉपिंग सेंटर समोरील चौकात आणि रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉक खाली बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत आहेत. हंडोरे यांनी नया नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही ठिकाणी सापळा रचून १५ बांगलादेशीना अटक केली. आरोपीत अल्पवयीन सह महिला व पुरुषांचा समावेश आहे. सदर बांगलादेशी मिळेल तसे मजुरी आदी काम करत असत.