ठाणे जिल्ह्यातील १४६८३ शिक्षक सोमवारी बजावणार मतदानाचा हक्क, महिला मतदार अधिक
By सुरेश लोखंडे | Updated: January 29, 2023 19:22 IST2023-01-29T19:21:40+5:302023-01-29T19:22:23+5:30
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी साेमवारी मतदान आहे.

ठाणे जिल्ह्यातील १४६८३ शिक्षक सोमवारी बजावणार मतदानाचा हक्क, महिला मतदार अधिक
सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी साेमवारी मतदान आहे. या निवडणूक रिंगणातील आठ उमेदवारांसाठी जिल्ह्यातील १४ हजार ६८३ शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळाला आहे. यात सर्वाधिक आठ हजार ७६७ महिला मतदारांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यातील २० मतदान केंद्रांवर या शिक्षकांना मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी मतदान केंद्र सज्ज झाले आहेत.
मतदानासाठी सज्ज झालेल्या ठाणे जिल्ह्यातील २० मतदान केंद्रांवर चाेख बंदाेबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात १४ हजार ६८३ शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी केली आहे. यामध्ये आठ हजार ७६७ स्त्री मतदार असून पाच हजार ९१६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी काेकणातील तब्बल ३७ हजार ७१९ शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळाला आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत नशिब अजमावत असलेल्या आठ उमेदवारांना या मतदारांकडून मतदान हाेणार आहे. सकाळी ८ वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी प्रारंभी १३ जणांनी उमेदवारी दाखल केली हाेती. त्यापैकी पाच जणांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिल्लक असलेल्या आठ उमेदवाराना मतपत्रिकेव्दारे पसंती क्रमांकाव्दारे शिक्षक मतदान करणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"