शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

महापालिका आणि परिवहनच्या कर्मचाऱ्यांना 14 हजार सानुग्रह अनुदान, कंत्रटी कामगारांनाही 10 हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 5:25 PM

ठाणे - मागील वर्षी प्रमाणो यंदा देखील कोणत्याही प्रकारचे आंदोलने न करता, महापालिका कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा पालिका प्रशासन आणि म्युनिसिपल लेबर युनियन यांच्यात झालेल्या वाटाघाटीच्या चर्चेनंतर पालिका आणि परिवहनच्या कामगारांना 14 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर कंत्रटी कामगारांना देखील 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. ...

ठाणे - मागील वर्षी प्रमाणो यंदा देखील कोणत्याही प्रकारचे आंदोलने न करता, महापालिका कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा पालिका प्रशासन आणि म्युनिसिपल लेबर युनियन यांच्यात झालेल्या वाटाघाटीच्या चर्चेनंतर पालिका आणि परिवहनच्या कामगारांना 14 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर कंत्रटी कामगारांना देखील 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. प्रशासनाचा हा निर्णय युनियनने देखील मान्य केला असल्याची माहिती युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी दिली आहे . दोन महिन्यांपूर्वीच सानुग्रह अनुदानाची मागणी करूनही ठाणे महापालिकेच्या वतीने निर्णय घेण्यात आला नसल्याने पालिकेच्या कर्मचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. कर्मचा:यांना दिवाळीपूर्वी 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावी अशी मागणी कर्मचा-यांनी केली होती. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारे हालचाली झाल्या नव्हत्या. त्यामुळे पालिकेच्या विरोधात प्रखर आंदोलनाचा इशारा म्युनिसिपल लेबर युनियनने दिला होता. सानुग्रह अनुदानाबत शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनामध्ये एक महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पालिकेच्या आस्थापनेवर असणा-या कर्मचा-यांना आणि परिवहनच्या कर्मचा-यांना 14 हजार तर कंत्रटी कामगारांना एक वेतन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ठाणो महापालिकेचे उत्पन्न 3 हजार कोटींच्या घरात असून, पालिकेचे महसूल वाढवण्यामध्ये कर्मचा:यांचा मोठा वाटा असल्याचा दावा युनियनने केला आहे. महापालिकेच्या एकूण बजेटच्या 69 टक्के महसुली उत्पन्न आहे. पूर्वी कर्मचा:यांच्या वेतनावर 59 टक्के खर्च होत होता, तोच खर्च आता बजेटच्या 20 टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने कर्मचा-यांची संख्या देखील कमी असून त्यामुळे कर्मचा-यांवर कामाचा ताण देखील अधिक आहे. त्यामुळे यावेळी ज्यादा रकमेच्या बोनसची मागणी करण्यात आली होती. चौकट - पालिका कर्मचा:यांना आणि परिवहन कर्मचा:यांना एकाच वेळी सानुग्रह अनुदान मंजुर केले जाते. परंतु पालिका कर्मचा-यांना आधी आणि परिवहन कर्मचा-यांच्या बॅंक खात्यात तीन ते चार दिवस उशिराने सानुग्रह अनुदान जमा होते. परंतु तसे न करता एकाच दिवशी हे सानुग्रह अनुदान जमा व्हावे अशी मागणी परिवहनचे सभापती अनिल भोर यांनी महापौरांकडे एका पत्रद्वारे केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका