शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणीबिलांची 133 कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:12 IST

ठाणे महापालिकेची विशेष माेहीम : मार्चअखेर लक्ष्यपूर्तीचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे  : महापालिका प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत पाणीबिलापोटी १३३ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षी ४ मार्चपर्यंत ११८.६५ कोटीची वसुली झाली होती. मात्र, यंदा कोरोना टाळेबंदीमुळे ऑगस्ट महिन्यापासून पाणी देयकांची वसुली सुरू झाली असली तरी ती गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.३५ कोटी अधिक झाली आहे. तर मार्च अखेरपर्यंत आयुक्तांनी प्रस्तावित केलेले १५० कोटींचे लक्ष पार करू, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.कोरोना रोखण्याच्या कामात महापालिकेची यंत्रणा व्यस्त होती. यामुळे जुलै महिना अखेरपर्यंत मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली होऊ शकली नव्हती. त्यामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दोन्ही करांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून प्रशासनाने कर वसुलीवर भर दिला. यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या नेतृत्वाखाली पथके कार्यरत केली. या मोहिमेत चालू आणि मागील वर्षांच्या पाणी देयकांची वसुली केली जात आहे. यात थकबाकी देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची नळजोडणी तोडली जात असून ४ मार्चपर्यंत ३ हजार ६९० नळजोडण्या तोडल्या आहेत. यामुळे आतापर्यंत एकूण १३३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. थकबाकीदारांसाठी व्याज १०० टक्के माफ केल्यामुळे या योजनेचा लाभ अनेक करदात्यांनी घेतला असून आतापर्यंत १६.९४ कोटींची वसुली झाली आहे. यामध्ये ६.२१ कोटी प्रशासकीय आकार माफ केला आहे.  

नागरिकांची ऑनलाइन कर भरण्यास पसंतीमालमत्ता कराप्रमाणे ठाणेकरांनी पाणी बिलाची रक्कम ऑनलाईन भरण्यावर भर दिला आहे.  ४ मार्चपर्यंत १०.८९ कोटींची वसुली केली आहे. 

२५ कोटींनी उद्दिष्ट केले कमीमहापालिका क्षेत्रात एकूण दीड लाख घरगुती तर ६ हजार ५०० वाणिज्य नळ जोडणीधारक आहेत. पाणी देयकांच्या वसुलीपोटी अर्थसंकल्पामध्ये १७५ कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, ते कमी करून आता १५० कोटी केले आहे. गेल्यावर्षी १३३ कोटींची वसुली झाली होती. त्यामुळे येत्या मार्च अखेरपर्यंत १३३ कोटीं ऐवजी १५० कोटींचा आकडा गाठणे शक्य होईल, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे