ठाणे जिल्ह्यातील १३२०८ मतदान यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत स्ट्राॅंगरूममध्ये!
By सुरेश लोखंडे | Updated: May 20, 2024 20:39 IST2024-05-20T20:38:56+5:302024-05-20T20:39:04+5:30
या मतदान यंत्राना ३७ ट्रक, १९ टेम्पाे आणि ३१ कंटेनरव्दारे या ट्राॅंगरूममध्ये जमा करण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील १३२०८ मतदान यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत स्ट्राॅंगरूममध्ये!
ठाणे: जिल्ह्यातील ठाणे लाेकसभेच्या २४ उमेदवारांसह, कल्याणच्या २८ आणि आणि भिवंडी २७ उमेदवारांसाठी जिल्ह्याभरात साेमवारी जल्लाेषात मतदान झाले. जिल्ह्याभरातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांपैकी ५० ते ५५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्याभरातील १८ विधानसभा मतदारसंघातील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर या मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्रात (ईव्हीएम) त्यांचे बंदिस्त केले आहे.
आता या सर्व इव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदाेबस्ता ठिकठिकाणच्या ट्राॅंगरूममध्ये जमा करण्यात आल्या. या मतदान यंत्राना ३७ ट्रक, १९ टेम्पाे आणि ३१ कंटेनरव्दारे या ट्राॅंगरूममध्ये जमा करण्यात आले आहेत. या जमा झालेल्या ठिकाणीच ४ जून राेजी या यंत्रांमधील मतमाेजणी करण्यात येईल. ताेपर्यंत या यंत्रणाची सुरक्षा शस्त्रधारी सीआरपीएफ, आरपीएफच्या जवानांकडून तीन टप्यात हाेईल.
ठाणे लाेकसभा मतदारसंघातील चार हजार ९०६ मतदान यंत्राव्दारे मतदारांनी त्यांचे बंदीस्त केले आहे. या यंत्रांना सात ट्रक, ११ टेम्पाे आणि १६ कंटैनर आणण्यासाठी वापरण्यात आले आहे. या सर्व यंत्राणा दाेन हजार ४५३ मतदान केंद्रांवरून कडक सुरक्षेत कावेसर यंथील न्यू हाेराॅयझन हायस्कूल, कासारवडवली, घाेडबंदर राेड येथे जमा करण्यात आलेली आहेत. याच हायस्कूलमध्ये मतमाेजणी करण्यात येणार आहे. तर कल्याण लाेकसभेच्या एक हजार ९६० मतदान केंद्रांवरील तीन हजार ९२० मतदान यंत्र डाेंबिवली पूर्वच्या सावित्रीबाई फुले कलामंदीर, नाट्यगृहाच्या तळमजल्यात ही यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहेत.
या यंत्राना दहा ट्रक्र, सहा टेम्पाे आणि सात कंटेनरव्दारे या ट्राॅंग रूममध्ये जमा करण्यात आली. या यंत्रातील मतमाेजणी डाेंबिवली पूर्वच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै. सुरेद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार पडणार आहे. तर भिवंडी लाेकसभेच्या दाेन हजार १९१ मतदान केंद्रांवरील चार हजार ३८२ मतदान यंत्रांना सावद गांव येथील केयुडी बिझनेस क्लस्टर, येथे २० ट्रक, दाेन टेम्पाे आणि आठ कंटेनरव्दारे आणण्यात आले आहेत. येथेच मतमाेजणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.