ठाणे जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे १३०० नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 08:00 IST2021-03-17T07:59:38+5:302021-03-17T08:00:17+5:30
ठाणे शहरात ३७० रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा ६६ हजार २१८ वर गेला आहे, तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार ४१४ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे १३०० नवे रुग्ण
ठाणे : मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. मंगळवारी तब्बल एक हजार ३५९ बाधित आढळले असून १५ दिवसांतील ही सर्वाधिक वाढ आहे. तर दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार ९२८ रुग्णसंख्या असून सहा हजार २४९ मृत्यूंची नोंद मंगळवारी झाली आहे.
ठाणे शहरात ३७० रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा ६६ हजार २१८ वर गेला आहे, तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार ४१४ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत ४८६ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला. या शहरात आता ६७ हजार ५७९ बाधित असून एक हजार २२० मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगरला ३७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. भिवंडीला २३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ९७७ बाधितांसह ३५६ मृतांची नोंद झाली आहे. मीरा-भाईंदरला १०७ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात आता २७ हजार ८८ बाधितांसह ८०७ मृतांची नोंद झाली आहे. अंबरनाथ शहरात ४५ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता नऊ हजार २४२ बाधितांसह मृतांची संख्या ३१६ नोंद झाली आहे. बदलापूर परिसरामध्ये ६८ रुग्ण सापडल्यामुळे बाधित रुग्ण नऊ हजार ६४० झाले असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूंची संख्या १२३ कायम आहे.