शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

दहा दिवसांत १३ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 11:27 PM

ठाणे महापालिकेला दिलासा : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के

अजित मांडकेठाणे : कोरोनाला अटकाव करण्यासाठी घेतलेल्या लॉकडाऊनचा चांगला परिणाम ठाण्यात झाल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी हात असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. यात गेल्या १० दिवसांत ठाण्यात आठ हजार ३३१ नवे कोरोना रुग्ण आढळले असले तरी याच कालावधीत तब्बल १३ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, १० दिवसांत १०४ जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. ठाणे महापालिकेने उचलेल्या पावलांमुळे रुग्णसंख्या घटत असून, रुग्ण बरे होण्याचा टक्का हा ९२ टक्क्यांवर गेला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत फेब्रुवारी मध्यापर्यंत कोरोना आटोक्यात असल्याचे दिसत होते. परंतु, फेब्रुवारी अखेरपासून पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने ठाणेकरांच्या चिंतेच भर पडली आहे. त्यानुसार मार्चच्या एका महिन्यात शहरात १४ हजार ७४७ नव्या रुग्णांची भर पडली, तर एप्रिल महिन्यात ४१ हजार २५ नवे रुग्ण आढळले. परंतु, याच कालावधीत ३९ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मातदेखील केल्याचे दिसून आले. तर लॉकडाऊनच्या आधीपर्यंत रोजच्या रोज ठाण्यात पंधराशे ते अठराशे नवे रुग्ण आढळत होते. परंतु, सध्या हाच आकडा ५०० ते ७०० च्या घरात स्थिरावल्याचे दिसत आहे. ठाणेकरांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिल्यानेच खऱ्या अर्थाने ते कोरोनावर मात करू लागले आहेत.आतापर्यंत एक लाख २० हजार ९२५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात एक लाख ११ हजार ६१ जण कोरानामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८२ टक्क्यांपर्यंत होते. त्यात आता १० टक्यांची वाढ झाला आहे. सध्या ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९२ टक्क्यांवर गेला आहे. सध्याच्या घडीला आठ हजार १४८ रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत आहेत.

सध्याच्या नव्या ट्रेंडनुसार घरातील एकाला बाधा झाली तर इतरांना बाधा होत आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढत होते. परंतु, पालिकेने यावरदेखील अंकुश मिळविला आहे. सध्या प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी पाच हजार ५१० रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत. तर दोन हजार ३१९ रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील पाच हजार ८२९ रुग्णांत कोणतेही लक्षणे नाहीत. तर एक हजार ७५५ रुग्णांत सौम्य लक्षणे आढळली. याशिवाय ६४ रुग्ण हे क्रिटिकल असून, ३८२ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, तर १८२ जणांना व्हेंटिलेटर्स लावले आहेत. दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधी हा महिनाभरापूर्वी ५५ दिवसांवर होता. तो आता १२७ दिवसांवर आला आहे. १० दिवसांचा विचार केल्यास शहरात रुग्णांची संख्या घटत आहे.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. या काळात आठ हजार ३३१ नवे रुग्ण आढळले असून, १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ हजार ९७१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

नवे रुग्ण    मृत्यू    बरे झालेले         रुग्ण११०८      ८        १६७५१०५४     १०      १४९५६९८     ८        १३५०७७०      ११      १४५८९७१     १५      १५८२८६३      १३     १३०७८६३     १३      १२८३७३२    ९        १२५५७५६    ८        १४४५५१६    ९        ११२१८३३१     १०४    १३९७१

 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या