शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ‘त्या’ आरोपीच्या संपर्कातील १३ पोलिसांचे अलगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:12 IST

पालघर पोलीस ठाण्यात एकच खळबळ

पालघर : पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उमरोळी येथील ४४ वर्षीय आरोपीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पालघर पोलीस ठाण्यातील १३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.पालघर तालुक्यातील उमरोळी येथील एका इसमाचे आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडण होत असे. सततच्या त्रासाला कंटाळून सदर महिलेने आत्महत्या केली होती. पत्नीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानंतर पतीला पोलिसांनी अटक करीत त्याला पालघर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्यात कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने त्याच्या घशातील नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते. शुक्रवारी पालघर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून यामुळे पालघर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीच्या संपर्कात कोण कोण आले आहे याची माहिती घेण्यात आल्यानंतर एका पोलीस उपनिरीक्षकासह १३ कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली. आरोपी रुग्णाला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस