शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ठाण्यात विविध १२१ पक्ष्यांचा मृत्यु महापालिकेने कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 8:52 PM

Bird Flu : देशभरातील अनेक राज्यात कोरोना पाठोपाठ बर्ड फ्ल्युने डोके वर काढले आहे. राज्यात देखील आठ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्युने दस्तक दिली आहे.

ठाणे - ठाण्यात कोरोनापाठोपाठ बर्डफ्ल्युचे प्रमाण वाढत असून पक्षांच्या मृत्यू प्रमाणात देखील झपाट्याने वाढ झाली आहे. ठाणो शहरात दिवसेंदिवस पक्षी मृत्युमुखी पडत असून सोमवार पर्यंत तब्बल १२१ विविध जातीच्या पक्षांचा मृत्यू झाला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याआधी देखील गेली 3 दिवस शहरात विविध ठिकाणी पक्षी मृत्यू पडल्याची घटना घडत होती. पहिल्या दिवशी १६, दुसऱ्या दिवशी २८, तिसऱ्या दिवशी ५२ तर सोमवार पर्यंत एकूण १२१ पक्षाचा मृत्यची नोंद झाली आहे.देशभरातील अनेक राज्यात कोरोना पाठोपाठ बर्ड फ्ल्युने डोके वर काढले आहे. राज्यात देखील आठ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्युने दस्तक दिली आहे. ठाण्यात देखील या आजाराने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये चिंती व्यक्त होत आहे. गेले वर्षभर कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता कुठे मुळपदावर येत असतांनाच या नव्या संकटाने सर्वजण धास्तावले आहेत. राज्यातील अनेक कुक्कुटपालक चिंतीत असून राज्यात अनेक ठिकाणी पक्षी मरून पडत आहेत. कोंबड्यांचे मृत्यू प्रमाण वाढल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा संकटात आला आहे. ठाण्यात देखील अनेक पक्षी मृत्यमुखी पडले असून याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका देखील सतर्कझाली आहे. ठाणो महापालिकेने एक आपत्कालीन कक्ष स्थापन केला असून कोणताही पक्षी मृत्यू आढळल्यास नागरिकांनी तत्काळ दिलेल्या दूरध्वनी क्र मांकावर संपर्ककरावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी केले आहे.यापूर्वी पक्षांचा मृत्यु झाला होता. त्यातील चार पक्षांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युने झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर सोमवार र्पयत विविध जातीच्या १२१ पक्षांचा मृत्यु झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परंतु त्यांचा मृत्यु कशाने झाला याची माहिती मिळाली नसली तरी त्या पक्षांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. तसेच या पक्षांच्या योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूthaneठाणे