शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील १२० मुख्याध्यापक-शिक्षकांना बाल लैंगिक शोषण प्रतिबंधात्मक धडे!

By सुरेश लोखंडे | Updated: March 24, 2023 18:22 IST

डोंबिवली (पू.) येथील संत तुलसीदास हिंदी माध्यमिक हायस्कूलमध्येही मुंबई स्थित अर्पण फाऊंडेशने बाल सुरक्षा मोहीम ही कार्यशाळा गुरूवार, शुक्रवार या दोन दिवसाच्या कालावधीत घेतली, असे शहापूरच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नंबर १ शाळेचे मुख्याध्यापक सुधीर भोईर यांनी लोकमतला सांगितले.

ठाणे : ‘बाल लैंगिक शोषणास’ प्रतिबंध करणाऱ्या वैयक्तिक सुरक्षा शिक्षण या दोन दिवसीय कार्यक्रमात जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक तसेच केंद्र प्रमुख आदींना बाल लैगिक शोषण प्रतिबंधात्मकतेचे धडे देण्यात आले. डोंबिवली (पू.) येथील संत तुलसीदास हिंदी माध्यमिक हायस्कूलमध्येही मुंबई स्थित अर्पण फाऊंडेशने बाल सुरक्षा मोहीम ही कार्यशाळा गुरूवार, शुक्रवार या दोन दिवसाच्या कालावधीत घेतली, असे शहापूरच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नंबर १ शाळेचे मुख्याध्यापक सुधीर भोईर यांनी लोकमतला सांगितले.

     शाळांमध्ये वैयक्तिक सुरक्षा शिक्षण लागू करण्यासह पालक व प्रौढ भागधारकांसह या विषयावर सत्र या कार्यशाळेत आयोजित करून  मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास या कार्यशाळेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या मोहिमेव्दारे ठाणे जिल्ह्यतील आदर्श शाळा शिक्षकांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. यात जवळपास १२० शिक्षकांनी सहभाग घेतला.आदर्श शाळा हा महाराष्ट्र शासनाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या आदर्श शाळा उपक्रमात बाल लैंगिक शोषण या मुद्द्याची ओळ, मुल आणि मुलांचे अधिकार, बाल शोषण आणि बाल लैंगिक शोषणाचे प्रकार, आकडेवारी, बाल लैंगिक शोषणाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव, पोक्सो कायदा आणि तरतूदी आदींचे धडे या कार्यशाळेत देण्यात आले आहे.

लैंगिक शोषण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम "वैयक्तिक सुरक्षा शिक्षण" ही माहिती ६ ते १६ वयोगटातिल मुलांसाठी, गोष्टींवर आधारित वैयक्तिक सुरक्षा शिक्षण आणि आॅनलाईन ई-लर्न कोर्सचा परिचय व प्रतिबंधात्मक धड़े देऊन, जीवन कौशल्यवर आधारित माहिती देऊन मुलांचे सक्षमीकरण कसे करावे इत्यादी माहिती शिक्षकांना यावेळी देण्यात आली. 

टॅग्स :SchoolशाळाthaneठाणेTeacherशिक्षक