कल्याण डोंबिवलीत 11 नवे रुग्ण आढळले; तीन महिला पोलिसांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 17:26 IST2020-05-05T17:25:52+5:302020-05-05T17:26:56+5:30

एकूण रुग्णांची संख्या झाली 224

11 new patients found in Kalyan Dombivali; Including three female police officers | कल्याण डोंबिवलीत 11 नवे रुग्ण आढळले; तीन महिला पोलिसांचा समावेश

कल्याण डोंबिवलीत 11 नवे रुग्ण आढळले; तीन महिला पोलिसांचा समावेश

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांना तीन महिला पोलिसांचा समावेश आहे. एकूण रुग्णांची संख्या 224 झाली आहे.
नव्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेत राहणा:या तीन महिला पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच एका पोलिसाला कोरोना झाला आहे. हे चारही पोलिस कल्याण पूव्रेत राहतात. कल्याण पश्चिमेतील खाजगी क्लासमध्ये काम करणा:या 44 वर्षीय महिलेस कोरोना झाला आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या 28 वर्षीय नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. ती डोंबिवली पश्चिम भागात राहते. कल्याण पूव्रेतील 38 वर्षीय पुरुषाला ही लागण झाली आहे. तो मुंबईतील खाजगी रुग्णालयात फार्मासीस्ट आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेल्या दोन कर्मचा:यांना कोरोना झाला आहे.  यापैकी एक जण डोंबिवली पश्चिम व दुसरा डोंबिवली पूव्रेत राहतो. कोरोना रुग्णाच्या सहवासात आलेल्या मांडा टिटवाळ्य़ात 55 वर्षीय इसमा व कल्याण पूव्रेतील 26 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना बाधित रुग्णांपैकी उपचार घेऊन बरे झालेल्या 74 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 147 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Web Title: 11 new patients found in Kalyan Dombivali; Including three female police officers