मोबाइल कंपन्यांची ११ कोटींची थकबाकी; निम्मीच रक्कम भरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:54 AM2018-10-12T00:54:43+5:302018-10-12T00:55:01+5:30

शहरातील एकूण २०३ मोबाइल टॉवर मालकांकडून महापालिकेचे ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३ रुपये थकबाकी आहे. चार वर्षांपासून हे टॉवर मालक पालिकेच्या कराची अर्धवटच रक्कम भरत आहेत.

 11 million ombudsmen for mobile companies; Fill in half the amount | मोबाइल कंपन्यांची ११ कोटींची थकबाकी; निम्मीच रक्कम भरतात

मोबाइल कंपन्यांची ११ कोटींची थकबाकी; निम्मीच रक्कम भरतात

Next

भिवंडी : शहरातील एकूण २०३ मोबाइल टॉवर मालकांकडून महापालिकेचे ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३ रुपये थकबाकी आहे. चार वर्षांपासून हे टॉवर मालक पालिकेच्या कराची अर्धवटच रक्कम भरत आहेत.
शहरातील दोन कंपनीच्या मोबाइल टॉवरचे मालक वारंवार नोटिसा बजावूनही थकबाकी भरत नाही. शहरात रिलायन्सचे २७ मोबाइल टॉवर असून त्यांची एक कोटी ८३ लाख २९ हजार, टाटा इंडिकॉम ५६ टॉवरचे तीन कोटी ८२ लाख ७९ हजार २६० रूपये, बीएसएनएल १७ टॉवरचे दोन कोटी ३४ लाख ६९ हजार २६९ रूपये, जीटीएल चार टॉवरचे २६ लाख ४० हजार ४३२ रूपये, इंडस् ५४ टॉवरचे दोन कोटी ३५ लाख दोन हजार ४७३ रूपये, एअरटेल एका टॉवरचे चार लाख ४४ हजार ७४ रूपये, व्होडाफोन एकाचे सात लाख ६५ हजार १४५ रूपये असे एकूण ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३रूपये थकबाकी आहे. केवळ आयडिया व जीओ कंपनीच्या टॉवर मालकांनी आपली थकबाकी भरली आहे.

बँकेची खाती गोठवणे शक्य
न्यायालयाच्या आदेशानुसार थकबाकीदार मोबाइल टॉवरची सेवा खंडित न करता टॉवरमालकांची किंवा कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई, त्यांची बँकेची खाती गोठविण्याची कारवाई करता येऊ शकते, अशी माहिती कर उपायुक्त वंदना गुळवी यांनी दिली. आयुक्त मनोहर हिरे यांच्यासी संपर्क साधला असता ते म्हणाले टॉवर मालक किंवा कंपनीची बँकेतील खाती गोठविण्याची कारवाई करण्यात येणार आहे,असे त्यांनी सांगीतले.

Web Title:  11 million ombudsmen for mobile companies; Fill in half the amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.