जिल्ह्यात ११ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार कोरोनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:54 IST2021-02-27T04:54:15+5:302021-02-27T04:54:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : कोरोना या जागतिक महामारीतून बचाव करण्यासाठी आरोग्ययंत्रणेसह पोलीस आणि प्रशासनाच्या या फ्रन्टलाइन वर्कर पाठोपाठ ...

11 lakh senior citizens in the district will get corona vaccine | जिल्ह्यात ११ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार कोरोनाची लस

जिल्ह्यात ११ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार कोरोनाची लस

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : कोरोना या जागतिक महामारीतून बचाव करण्यासाठी आरोग्ययंत्रणेसह पोलीस आणि प्रशासनाच्या या फ्रन्टलाइन वर्कर पाठोपाठ आता ज्येष्ठ नागरिकांनाही एक मार्चपासून कोरोना लसी देण्याचे नियोजन आहे. यासाठी जिल्ह्यातील तब्बल ११ लाख ४०८ ज्येष्ठ नागरिकांना ४४ लसीकरण केंद्रांवर ही लस देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी व त्याविरोधात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने राज्यभरात ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ या दोन प्रकारच्या लसींना मान्यता दिली आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ या लसीचा डोस जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे फ्रन्टिअर अधिकारी, कर्मचाऱ्यांपाठोपाठ प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि तिसऱ्या टप्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या नियंत्रणात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांकडून या लसीकरणाचे काम सुरू आहे.

तिसऱ्या टप्प्यातील या लसीकरणापाठोपाठ आता ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. यास अनुसरून जिल्ह्यातील तब्बल ११ लाख ४०८ ज्येष्ठांना या लसीकरणाचा लाभ देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील सहा महापालिकांसह दोन नगर परिषदा आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील ग्रामीण भागातील २९ केंद्र आदी ४४ लसीकरण केंद्रांवरच या ज्येष्ठ नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ देण्याचे नियोजन हाती घेतले जात आहे.

Web Title: 11 lakh senior citizens in the district will get corona vaccine