भिवंडीत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचे १०८ सूर्यनमस्कार

By नितीन पंडित | Updated: February 9, 2023 17:47 IST2023-02-09T17:47:21+5:302023-02-09T17:47:50+5:30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कामतघर येथील माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी विविध विकास कार्यक्रमाच्या शुभारंभा सोबतच विद्यार्थ्यांच्या सूर्य नमस्कार कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

108 Surya Namaskars by students on the occasion of Eknath Shinde's birthday in Bhiwandi | भिवंडीत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचे १०८ सूर्यनमस्कार

भिवंडीत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचे १०८ सूर्यनमस्कार

भिवंडी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कामतघर येथील माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी विविध विकास कार्यक्रमाच्या शुभारंभा सोबतच विद्यार्थ्यांच्या सूर्य नमस्कार कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली संस्थेच्या सहकार्याने स्व. मोतीराम काटेकर क्रीडांगणावर सकाळी सात वाजता पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय, तपोवन स्कूल, पी ई एम स्कुल, पालिका शाळा क्रमांक ३३, पालिका शाळा क्रमांक ४२, बाल विद्यानिकेत स्कूल, वंदनाताई काटेकर स्कूल, सरस्वती स्कूल, या शाळां मधील १००८ विद्यार्थ्यांनी तब्बल १०८ सूर्यनमस्कार घालून एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

याप्रसंगी माजी नगरसेविका वंदना काटेकर, संतोष पाटील, शरद पाटील, तेजस काटेकर, संदीप भोईर यांसह अनेक मान्यवर पतंजली संस्थेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: 108 Surya Namaskars by students on the occasion of Eknath Shinde's birthday in Bhiwandi

टॅग्स :thaneठाणे