ठाणे जिल्ह्यात दिवसभरात समोर आले १०३२ नवे कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 20:51 IST2021-03-10T20:50:20+5:302021-03-10T20:51:12+5:30
ठाणे शहर परिसरात २५६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार २९१ झाली आहे. शहरात दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या १ हजार ४०५ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ३९२ रुग्णांची वाढ झाली आहे. (1032 new corona affected in Thane district during)

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात समोर आले १०३२ नवे कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू
ठाणे: जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे १०३२ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता २ लाख ७२ हजार १९३ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार ३१५ झाली आहे. (1032 new corona affected in Thane district during the day three death)
ठाणे शहर परिसरात २५६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६४ हजार २९१ झाली आहे. शहरात दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या १ हजार ४०५ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ३९२ रुग्णांची वाढ झाली आहे. नवी मुंबईत १५६ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.
उल्हासनगरमध्ये ३० रुग्ण सापडले आहे. भिवंडीत १० बाधीत आहेत. मीरा भाईंदरमध्ये ५३ रुग्ण आढळले असून मृत्यूसंख्या शून्य आहे. अंबरनाथमध्ये २९ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये ५१ रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ५५ रुग्णांची वाढ झाली आहे. तर आता बाधीतांचा आकडा १९ हजार ७७३वर तर आतापर्यंतच्या मृतांचा आकडा ५९८वर पोहोचला आहे.