शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

महापालिकेचा फतवा, १0 फुटांच्या मूर्तींना विसर्जन घाटात बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 04:33 IST

सेनेचा विरोध : उल्हासनगर महापालिकेचा अजब फतवा

उल्हासनगर : शहरातील विसर्जन घाटात १0 फूट उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई करणारा अजब फतवा महापालिकेने काढला आहे. महापालिकेच्या या आदेशापूर्वीच गणेश मंडळांनी उंच मूर्ती बनविल्या असून, महापालिकेच्या या भूमिकेवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतला आहे. आयुक्तांनी यावर उपाय शोधून कल्याण खाडीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी सेनेने केली आहे.

महापालिका आयुक्त गणेश पाटील यांनी गणेश उत्सवानिमित्त वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस, कल्याणजी घेटे, पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत, जनसंपर्क अधिकारी विनोद केणे आदींची बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या रूपरेषेबाबत चर्चा केली. जास्त उंचीच्या मूर्तीमुळे दुर्घटना होऊ नये यासाठी कमी उंचीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन त्यावेळी सर्वस्तरातून करण्यात आले होते. गणेश उत्सव मंडळांनी नदी व खाडीतील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या गणपती मूर्ती घ्याव्यात, असे आवाहनही हिराली फाऊंडेशन आणि मेरा फाऊंडेशनने केले. तसेच विविध आकाराच्या मूर्तीही त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. उल्हासनगरातील आय.आय.डी.आय. कंपनीजवळ सर्व सुखसुविधायुक्त विसर्जन घाट बनविला असून १0 फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे विसर्जन येथे होणार आहे. सेंच्युरी रेयॉन, हिराघाट बोटक्लब, उल्हासनगर रेल्वेस्थानकाजवळील कृत्रिम तलाव, कैलास कॉलनी, गोलमैदान, शिवमंदिर घाट येथेही बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन, कैलास कॉलनी व गोलमैदान येथे कृत्रिम विसर्जन तलाव बनविण्यात आला आहे.शिवसेना विचारणार जाबशहरातील विसर्जन घाटावर १0 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींना विसर्जन करण्याची बंदी घालण्याचा फतवा पालिकेने काढला. शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यावर टीका केली आहे. आयुक्त गणेश पाटील यांनी यातून मार्ग काढून कल्याण खाडीचा मार्ग सुकर करण्याची मागणीही सेनेने केली. इतर पक्षांमधूनही महापालिकेच्या भूमिकेला विरोध होत आहे.३ वर्षांपूर्वी एका उंच गणेशमूर्तीच्या मिरवणुकीत उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का बसून दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवganpatiगणपतीShiv Senaशिवसेना