उल्हासनगरात १ लाखाची घरफोडी

By सदानंद नाईक | Updated: November 23, 2023 17:05 IST2023-11-23T17:04:17+5:302023-11-23T17:05:07+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-४, शोभा कुंज नागराणी मंदिर परिसरात समीर मनोहर रसाळ हे कुटुंबासह राहतात.

1 lakh burglary in Ulhasnagar | उल्हासनगरात १ लाखाची घरफोडी

उल्हासनगरात १ लाखाची घरफोडी

उल्हासनगर : कुटुंबासह मुंबई गिरगाव चौपाटीला फिरण्यासाठी गेलेल्या समीर रसाळ यांच्या घरात चोरीची घटना घडली. चोरांनी घरात प्रवेश करून कपाटातील १ लाखाची रोख रक्कम लंपास केली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-४, शोभा कुंज नागराणी मंदिर परिसरात समीर मनोहर रसाळ हे कुटुंबासह राहतात. दिवाळीची सुट्टी असल्याने, ते बुधवारी कुटुंबासह मुंबई गिरगाव चौपाटीवर फिरायला गेले होते. मात्र बंद घराचा फायदा चोरांनी घेतला. दुपारी चोरांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर मधून १ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. रसाळ कुटुंब रात्री घरी परत आल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 1 lakh burglary in Ulhasnagar