१ लाख ७६ हजारांचा ऐवज चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST2021-09-05T04:45:04+5:302021-09-05T04:45:04+5:30

------------------------------------------- चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तिघे अटकेत ठाणे : वागळे इस्टेट भागातील एका कंपनीच्या संरक्षक भिंतीवरून चढून कंपनीत प्रवेश ...

1 lakh 76 thousand was stolen | १ लाख ७६ हजारांचा ऐवज चोरीला

१ लाख ७६ हजारांचा ऐवज चोरीला

-------------------------------------------

चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तिघे अटकेत

ठाणे : वागळे इस्टेट भागातील एका कंपनीच्या संरक्षक भिंतीवरून चढून कंपनीत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दशरथ हराळे (२५) रा. किसननगर, पुरन कुमावत (२६) रा. किसननगर आणि विजय जाधव (२६) रा. शिवशक्तीनगर या तिघांना गुरुवारी अटक करण्यात आली. श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-----------------------------------------

सोनसाखळी हिसकावली

ठाणे : मुल्ला बाग येथे राहणारी ५८ वर्षीय महिला गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता फिरण्यासाठी जात असताना गौरव स्वीट जवळील सार्वजनिक रस्त्यावर पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची चेन खेचून पोबारा केला. चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

---------------------------------

Web Title: 1 lakh 76 thousand was stolen