You said we would play tennis together: Sania Mirza pens heartfelt tweet for Sushant Singh Rajput | 'तू म्हणाला होतास आपण एकत्र टेनिस खेळू!'; सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानं सानिया मिर्झा भावुक

'तू म्हणाला होतास आपण एकत्र टेनिस खेळू!'; सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानं सानिया मिर्झा भावुक

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका पडद्यावर हुबेहूब साकारणाऱ्या सुशांत सिंग राजपूतनं रविवारी राहत्या घरी  आत्महत्या केली. त्यानं आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच क्रीडाविश्वामध्येही दु:खाची लाट पसरली. कोणत्याही खेळाडूला सुशांतच्या अशा अचानक जाण्याच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीए. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यासह क्रीडा विश्वातील अनेक दिग्गजांनी सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली वाहिली. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं भावनिक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे.

‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीची भूमिका करण्यासाठी सुशांतने प्रचंड मेहनत घेतली होती. धोनीची स्टाईल जाणून घेण्यासाठी तो काही काळ त्याच्यासोबतही राहिला होता. या चित्रपटानंतर सुशांतचे क्रीडा विश्वात अनेक मित्र कमावले. सानिया मिर्झाही त्यापैकी एक होती. त्यामुळे सुशांतच्या जाण्यानं सानियालाही धक्का बसला आहे. 
तिनं भावनिक पोस्ट लिहिली. ''एक दिवस आपण एकत्र टेनिस खेळू असं तू म्हणाला होतास... तू नेमही सर्वत्र आनंद पसरवत आला आहेस. त्यामुळे तू अशा प्रकारे आम्हाला धक्का देशील, याची कल्पनाही केली नव्हती. हे जग तुला किती मिस करतंय, याची तुलाही कल्पना नसेल. हे लिहितानाही माझे हात थरथर कापत आहेत. देव तुझ्या आत्म्याला शांती देओ मित्रा.'' 


सानियाचा पती व पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यानंही श्रद्धांजली वाहिली. त्यानं लिहिलं की,''सुशांत सिंगनं आत्महत्या केल्याचे ऐकून धक्काच बसला आहे. 34 वय हे जाण्याचं वय नाही.''

OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!

WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली

झिंगाट डान्स पाहून हरभजन सिंग झाला लोटपोट; 20 सेकंदाच्या Videoचा लय भारी शेवट पाहाच! 

सुशांतच्या मृत्यूचा MS Dhoniला बसलाय धक्का; मॅनेजरनं दिली माहिती

Web Title: You said we would play tennis together: Sania Mirza pens heartfelt tweet for Sushant Singh Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.