Wimbledon Tennis : फेडररने केली त्या चिमुकलीची इच्छा पूर्ण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 21:39 IST2018-07-02T21:38:36+5:302018-07-02T21:39:00+5:30
पुरूष एकेरीत सर्वाधिक 8 जेतेपद नावावर असलेल्या रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. पण सामन्यानंतर त्याने असे काही केले का प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Wimbledon Tennis : फेडररने केली त्या चिमुकलीची इच्छा पूर्ण...
विम्बल्डन - विम्बल्डन टेनिस स्पर्धा आपल्या आवडत्या खेळाडूंना जवळून पाहण्याची सुवर्णसंधी. जवळपास दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या या स्पर्धेत खेळाडूही प्रेक्षकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारतात. स्वाक्षरी करून चेंडू, टॉवेल, हेडबँड, हँडबँड प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावणे येथे नवीन नाही. त्यामुळे या स्पर्धेत प्रेक्षकही भरभरून प्रतिसाद देतात. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी याची प्रचिती आली. पुरूष एकेरीत सर्वाधिक 8 जेतेपद नावावर असलेल्या रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. पण सामन्यानंतर त्याने असे काही केले का प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
नवव्या विम्बल्डन जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या फेडररने सलामीच्या सामन्यात सर्बियाच्या ड्युसान लॅजोव्हिकवर 6-1, 6-3, 6-4 असा सहज विजय मिळवला.
The perfect start…
— Wimbledon (@Wimbledon) July 2, 2018
Defending #Wimbledon champion @RogerFederer cruises through to the second round with a 6-1, 6-3, 6-4 victory over Dusan Lajovic pic.twitter.com/DWpWBYowXf
सामन्यानंतर फेडरर प्रेक्षकांकडे गेला आणि स्वाक्षरी देऊ लागला. यावेळी एक चिमुकलीने हातात फलक धरला होता आणि त्याकडे फेडररचे बराच काळ लक्ष गेले नव्हते. मात्र काही कालावधीनंतर तो तिच्याकडे वळला. फलकावरील मॅसेज वाचला अन् आपली बॅग चाचपडल्यानंतर त्याने एक वस्तू बाहेर काढून त्या चिमुरडीची इच्छापूर्ण केली. त्या चिमुरडीने फलकावर असे काय लिहिले होते आणि फेडररने तिला कोणती वस्तू दिली.. पाहा हा व्हिडीओ...
Ask and you shall receive… 🤗#Wimbledon @rogerfedererpic.twitter.com/QaEVpNqenB
— Wimbledon (@Wimbledon) July 2, 2018