विम्बल्डन - सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला. तिने रशियाच्या इव्हजेनीया रोडीनाचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2 असा पराभव केला. तिने विम्बल्डन स्पर्धेत 13 वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आठवे विम्बल्डन जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने कोर्टवर उतरलेल्या सेरेनाने तासाभरात रोडीनाचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत सेरेनाने एकही सेट गमावलेला नाही. पुढील फेरीत तिला बिगरमानांकित कॅमिला जॉर्जीचा सामना करावा लागेल.
Wimbledon Tennis 2018 : सुपर मॉम सेरेना उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 21:35 IST