शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

नोव्हाक जोकोविकचा विम्बल्डन विजेतेपदांचा षटकार; फेडरर, नडालच्या त्या विक्रमाशी साधली बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 10:56 PM

Wimbledon 2021, Novak Djokovic: सर्बियाच्या नोव्हाक जोकोविकने आज झालेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविकने इटलीच्या मॅटेयो बेरेट्टीनीवर मात केली.

लंडन - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविकने आज झालेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविकने इटलीच्या मॅटेयो बेरेट्टीनीवर मात केली. (Wimbledon 2021)जोकोविकचे विम्बल्डनमधील हे सलग तिसरे आणि एकूण सहावे विजेतेपद ठरले आहे. तसेच जोकोविकचे हे कारकिर्दीतील एकूण २० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्यामुळे २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमाशी जोकोविकने बरोबरी साधली आहे. (Novak Djokovic Wins 20th Grand Slam With Sixth Wimbledon )

आज झालेल्या अंतिम लढतीमध्ये इटलीच्या मॅटेयो बेरेट्टीनी याने नोव्हाक जोकोविकला कडवी टक्कर दिली. पहिल्या सेटमध्ये बेरेट्टीनीने ७-६ अशी बाजी मारत खळबळ उडवली. मात्र सुरुवातीलाच बसलेल्या धक्क्यातून जोकोविकने स्वत:ला सावरले. त्यानंतर पुढच्या सेटमध्ये ६-४ असा विजय मिळवत जोकोविकने लढतीत बरोबरी साधली. मग पुढचे दोन्ही सेट ६-४ आणि ६-३ असे वर्चस्व राखून जिंकत जोकोविकने विजेतेपदावर कब्जा केला.

अखेरीस जोकोविकने मॅटेयो बेरेट्टीनीचे आव्हान ६-७, ६-४, ६-४, ६-३ अशा फरकाने परतवून लावत यंदाच्या विम्बल्डन विजेतेपदावर नाव कोरले.  

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचWimbledonविम्बल्डनTennisटेनिस