शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Wimbledon 2018 : जोकोव्हिच सम्राट, 13 वे ग्रँड स्लॅम जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 9:07 PM

येथील सेंटर कोर्टवर रंगलेल्या विम्बल्डन पुरूष एकेरीच्या जेतेपदाची लढत एकतर्फी झाली. दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांनी आपापल्या प्रतिस्पर्धींना पाच-सहा तासांच्या उपांत्य फेरीतील सामन्यात नमवल्यानंतर जेतेपदाचा सामना रोमहर्षक होईल अशी अपेक्षा होती. परंतु, जोकोव्हिचने सर्व तर्क चुकवताना अंतिम लढतीत 6-2, 6-2, 7-6 ( 7-3) असा सहज विजय मिळवला

लंडन - येथील सेंटर कोर्टवर रंगलेल्या विम्बल्डन पुरूष एकेरीच्या जेतेपदाची लढत एकतर्फी झाली. दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांनी आपापल्या प्रतिस्पर्धींना पाच-सहा तासांच्या उपांत्य फेरीतील सामन्यात नमवल्यानंतर जेतेपदाचा सामना रोमहर्षक होईल अशी अपेक्षा होती. परंतु, जोकोव्हिचने सर्व तर्क चुकवताना अंतिम लढतीत 6-2, 6-2, 7-6 ( 7-3) असा सहज विजय मिळवला. 2015 नंतर विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद नावावर करण्यात जोकोव्हिचला यश मिळाले. त्याचे हे एकूण 13वे जेतेपद ठरले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या रॉच इमरसन यांच्या 12 ग्रँड स्लॅम जेतेपदाचा विक्रम मोडला. पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचने बाजी मारली. शनिवारी राफेल नदालविरूद्ध चाललेल्या पाच तासांच्या सामन्यानंतरही रविवारी जोकोव्हिच ताजातवाना वाटत होता. त्याने सुरूवातीला संयमी खेळ करताना सर्व्हिसवर गेम जिंकले. त्याने 2-1 अशा आघाडीवर असताना चौथ्या गेममध्ये अँडरसनची सर्व्हिस ब्रेक केली.  त्यानंतर त्याने सलग दोन गेम घेत 5-1 अशी आघाडी घेतली. अँडरसनने सातवा गेम घेताना सामन्यात रंजकता आणण्याचा प्रयत्न केला, परंतु जोकोव्हिचने आठव्या गेमसह हा सेट 6-2 अशा जिंकला. 12 व्या मानांकित जोकोव्हिचसमोर 8 वा मानांकित अँडरसन थकलेला जाणवला. अवघ्या 29 मिनिटांत जोकोव्हिचने विजय मिळवला.दुस-या सेटमध्ये जोकोव्हिचने 2-0 अशा आघाडीसह सामन्यावर पकड घेतली. अँडरसनने तिसरा गेम जिंकला आणि ही पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जोकोने पुढील तीन सेट घेत 5-1 अशी भक्कम आघाडी घेतली. सातव्या गेममध्ये अँडरसनने सर्व्हिस राखली. या गेमसह त्याने एका विम्बल्डन स्पर्धेत सर्वाधिक 332 गेम्स खेळण्याचा विक्रम नावावर केला. पण जोकोव्हिचने आठवा गेम घेत हा सेट 6-2 असा नावावर केला. तोही अवघ्या 42 मिनिटांत...तिस-या सेटमध्ये अँडरसनने अनपेक्षित मुसंडी मारली. त्याने चुकांतून बोध घेताना या सेटमध्ये पहिल्या दोन सर्व्हिस राखण्यात यश मिळवले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापली सर्व्हिस राखण्यावरच भर दिला. अँडरसनला दहाव्या गेममध्ये जोकोव्हिचची सर्व्हिस ब्रेक करण्याची संधी होती. पण जोकोव्हिचने ती राखली आणि गेम 5-5 असा बरोबरीत आणला. पण टायब्रेकरमध्ये जोकोव्हिचने बाजी मारली. दरम्यान, मुले एकेरीच्या अंतिम फेरीत चायनिज तैपेइच्या चुंग सीन त्सेंग याने बाजी मारली. त्याने ब्रिटनच्या जॅक ड्रॅपरचा 6-1, 6-7 (2/7), 6-4 असा पराभव केला. ड्रॅपरला जेतेपद पटकावून इतिहास घडवण्याची संधी होती. 1962नंतर मुलांच्या गटात ब्रिटनच्या खेळाडूंना जेतेपद पटकावता आलेले नाही. 1962मध्ये स्टॅनली मॅथ्यू यांनी जेतेपदाचा चषक उंचावला होता. 

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनTennisटेनिसSportsक्रीडा