Wimbledon 2018 : मॅरेथॉन लढतीत अँडरसनची बाजी, इस्नरला नमवून गाठली अंतिम फेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 12:29 AM2018-07-14T00:29:51+5:302018-07-14T01:00:50+5:30

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात जवळपास साडे सहा तास मॅरेथॉन लढत रंगली.

Wimbledon 2018: Anderson win marathon match | Wimbledon 2018 : मॅरेथॉन लढतीत अँडरसनची बाजी, इस्नरला नमवून गाठली अंतिम फेरी

Wimbledon 2018 : मॅरेथॉन लढतीत अँडरसनची बाजी, इस्नरला नमवून गाठली अंतिम फेरी

Next

लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात जवळपास साडे सहा तास मॅरेथॉन लढत रंगली. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अँडरसनने  7-6(6),  6-7(5), 6-7(9), 6-4, 26-24 अशा फरकाने बाजी मारली.  विम्बल्डनच्या इतिहासातील एकेरीमधील ही  सर्वाधिक काळ चाललेली उपांत्य लढत ठरली.  



 

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रथमच प्रवेश करणा-या केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला नमवणा-या दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनने पहिला गेम टायब्रेकरमध्ये घेतला, परंतु अमेरिकेच्या इस्नरने पुढील दोन्ही गेम जिंकताना सामन्यात मुसंडी मारली. हे दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये गेले. तिसरा सेट टायब्रेकरमध्ये 11-9 असा लांबला. इस्नरने 0-1 अशा पिछाडीवरून 6-7 (8-6), 7-6 (7-5), 7-6 (11-9) अशी 2-1 ने आघाडी घेतली. 




चौथा सेट सुरू होण्यापूर्वी इस्नरकडे 2-1 अशी आघाडी असल्याने त्याचे पारडे जड मानले जात होते. मात्र, फेडररला झुंजवणा-या अँडरसनने हा सेट 6-4 असा सहज घेताना चुरस वाढवली. 



पाचवा आणि निर्णायक सेटमध्ये दोघांनीही तुल्यबळ खेळ केला. त्यात अँडरसनने  7-6(6),  6-7(5), 6-7(9), 6-4, 26-24 अशा फरकाने  विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. 

Web Title: Wimbledon 2018: Anderson win marathon match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.