१५ महिन्यांच्या बंदीनंतर शारापोवा परतणार कोर्टवरअमेरिकन ओपनमध्ये ‘वाईल्ड कार्ड’ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 19:06 IST2017-08-16T19:06:19+5:302017-08-16T19:06:24+5:30
२०१६ च्या आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘मेलडोनियम’ या अमली द्रव्य सेवनात शारापोवा दोषी आढळली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने तिला निलंबित केले. तिच्यावरील बंदी एप्रिल महिन्यात संपुष्टात आली.

१५ महिन्यांच्या बंदीनंतर शारापोवा परतणार कोर्टवरअमेरिकन ओपनमध्ये ‘वाईल्ड कार्ड’ प्रवेश
न्यूयॉर्क, दि 16 : पाच वेळेची चॅम्पियन रशियाची मारिया शारापोवा अमली द्रव्य सेवनात १५ महिन्यांच्या ‘बंदीचा वनवास’ संपवून पुन्हा टेनिस कोर्टवर परतणार आहे. २८ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये मारियाला ‘वाईल्ड कार्ड’ प्रवेश मिळाला. याच आठवड्यात जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये जगात १४८ व्या स्थानावर असलेल्या शारापोवाला नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपनमध्ये ‘वाईल्ड कार्ड’ मिळू शकले नव्हते. त्याआधी जांघेत झालेल्या दुखापतीमुळे ती विम्बल्डनमध्ये खेळू शकली नाही. तेव्हापासून मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी शरापोवाला वाईल्ड कार्डची गरज भासत आहे. सहकारी खेळाडूंनी मात्र शारापोवाच्या या कृतीवर सडकून टीका केली. अमेरिकन टेनिस संघटनेने मात्र शारापोवावरील निलंबन संपल्यामुळे वाईल्ड कार्ड निवड प्रक्रियेत तिला सहभागी कराववे असे सुचविले. भूतकाळात मुख्य ड्रॉमध्ये सहभागी होता यावे यासाठी माजी चॅम्पियन मार्टिना हिंगिस, लेटन हेविट, किम क्लिस्टर्स, युआन मार्टिन, डेल पेत्रो यांंना देखील वाईल्ड कार्ड देण्यात आल्याचे स्मरण यूएसटीएने करून दिले.