युएस ओपन: मारिया शारापोवाचं आव्हान संपुष्टात, अॅनाशिया सेवास्टोवाकडून चौथ्या फेरीत पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 06:13 IST2017-09-04T06:12:40+5:302017-09-04T06:13:39+5:30

युएस ओपन टेनीस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मारिया शारापोवाला लाटव्हियाच्या अॅनास्तेशिया सेवास्टोवा हिने तीन सेटमध्ये पराभूत केले. सेवास्टोवाने 5-7, 6-4, 6-2 असा हा सामाना जिंकला.

US Open: Due to Maria Sharapova's challenge, Anacia Sevastov's defeat in fourth round | युएस ओपन: मारिया शारापोवाचं आव्हान संपुष्टात, अॅनाशिया सेवास्टोवाकडून चौथ्या फेरीत पराभव

युएस ओपन: मारिया शारापोवाचं आव्हान संपुष्टात, अॅनाशिया सेवास्टोवाकडून चौथ्या फेरीत पराभव

न्यू यॉर्क, दि. 4 - युएस ओपन टेनीस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मारिया शारापोवाला लाटव्हियाच्या अॅनास्तेशिया सेवास्टोवा हिने तीन सेटमध्ये पराभूत केले. सेवास्टोवाने 5-7, 6-4, 6-2 असा हा सामाना जिंकला. शारापोवाने तीन मॅच पॉइंट वाचवले पण चौथ्यावर ती पराभव टाळू शकली नाही. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये शारापोवाची सर्विस तीन वेळा ब्रेक करण्यात आली.

सेवास्टोवाच्या 14 अनफोर्स एररच्या तुलनेत मारीयाच्या 51 अनफोर्स एररनी तिचा घात केला. सेवास्टोवाला युएस ओपनसाठी 16 वे मानांकन असून जागतिक क्रमवारीत ती 146 व्या स्थानी आहे. ती सलग दुसऱ्या वर्षी युएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचली आहे. तिचा पुढचा सामना आता स्लोन स्टिफन्सशी होईल.

Web Title: US Open: Due to Maria Sharapova's challenge, Anacia Sevastov's defeat in fourth round