सुमित नागलचा होणार रॉजर फेडररशी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 04:54 AM2019-08-25T04:54:18+5:302019-08-25T04:54:23+5:30

ग्रँड स्लॅम टेनिसमध्ये स्वप्नवत पदार्पण

Sumit Nagle will face Roger Federer | सुमित नागलचा होणार रॉजर फेडररशी सामना

सुमित नागलचा होणार रॉजर फेडररशी सामना

Next

न्यूयॉर्क : भारताचा टेनिसपटू सुमित नागल याने अमेरिकन ओपनच्या मेन ड्रॉसाठी पात्र ठरताना पहिल्या फेरीत सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असणाऱ्या रॉजर फेडररविरुद्ध खेळण्याचा हक्क मिळवला. हे त्याच्यासाठी ग्रँडस्लॅम स्पर्धामधील स्वप्नवत पदार्पण ठरणार आहे.

शुक्रवारी सुमित नागल याने अखेरच्या क्वॉलीफाइंग सामन्यात ब्राझीलच्या जोआओ मेनेजेस याच्याविरुद्ध एक सेट गमावल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना २ तास २७ मिनिटांत ५-७, ६-४, ६-३ असा विजय मिळवला. अशा प्रकारे २२ वर्षांचा हा खेळाडू या एका दशकामध्ये ग्रँडस्लॅम एकेरीच्या मुख्य फेरीत खेळणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी सोमदेव देववर्मन, युकी भांबरी, साकेत मायनेनी आणि प्रजनेश गुणेश्वरन हे टेनिस ग्रँडस्लॅम खेळलेले आहेत.

नागल २०१५ मध्ये ज्युनिअर ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा सहावा भारतीय बनला होता. त्याने नाम हाओंग ली याच्या साथीने विम्बल्डनमध्ये मुलांच्या गटात दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. प्रजनेशदेखील याच अमेरिकन ओपनमध्ये खेळत आहे. १९८८ मध्ये महेश भूपती आणि लिएंडर पेस विम्बल्डन खेळले होते. या दोघांनंतर तो प्रथमच ग्रँडस्लॅममध्ये सहभागी होत आहे. प्रजनेशचा सामना सिनसिनाटी मास्टर्स विजेता आणि जागतिक क्रमवारीतील पाचव्या स्थानावरील खेळाडू दानिल मेदवेदेव याच्याशी होईल.


भारताचा ताहितीवर विजय
नवी दिल्ली : भारताच्या १९ वर्षाआतील संघाने शुक्रवारी वनुआतूमध्ये ओसियन डेव्हलपमेंट स्पर्धेत पहिल्या स्थानासाठीच्या प्ले आॅफमध्ये ताहितीला २ -० असे पराभूत केले. भारतीय संघाने दुसºया हाफमध्ये दोन गोल केले आणि पहिले स्थान मिळवले. मनवीर सिंह याने ७१ वे आणि विक्रम प्रताप सिंह याने ८८ व्या मिनिटाला गोल केल.
 

दुखापतीशी खूप संघर्ष करावा लागल्याने नागल थोडा दुर्दैवी ठरला; परंतु त्याने या स्तरावर पुनरागमन करण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. अमेरिकन ओपनमध्ये रॉजर फेडररशी दोन हात करण्याचा प्रत्येक क्वॉलीफायरचे स्वप्न आणि दुस्वप्न ठरते. या अनुभवामुळे त्याचा खूप आत्मविश्वास उंचावेल, असे मला वाटते. फेडररविरुद्ध खेळण्याच्या या क्षणाचा आनंद नागलने घ्यायला हवा आणि त्याने आपला खेळ खेळायला हवा, असे मला वाटते. -भुपती

Web Title: Sumit Nagle will face Roger Federer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.