शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मॅरेथॉन सामन्यात वॉवरिंकाची सरशी; फ्रेंच ओपनमधील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 3:02 PM

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना रविवारी खेळला गेला.

- ललित झांबरे  

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना रविवारी खेळला गेला. त्यात माजी विजेता स्वित्झर्लंडचा स्टान वॉवरिंकाने ग्रीसच्या स्टेफानोस सीसीपासवर  7-6(6), 5-7, 6-4, 3-6, 8-6 असा विजय मिळवला, मात्र या विजयासाठी त्याला तब्बल पाच तास 9  मिनीटे  संघर्ष करावा लागला. 

पुरुषांच्या व्यावसायिक टेनिसमधील पाच तासापेक्षा अधिक काळ खेळ झालेला हा 47 वा सामना ठरला तर फ्रेंच ओपनच्या इतिहासातील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना ठरला. वावरिंका हा कारकिर्दीत दुसऱ्यांदा पाच तासाच्यावर रंगलेला सामना खेळला. यापूर्वी 2013 च्या ऑस्ट्रेलियन ओपन चौथ्या फेरीत तो नोव्हाक जोकोवीचकडून पाच तास 2  मिनिटांच्या संघर्षानंतर पराभूत झाला होता. सीसीपास मात्र त्याच्या कारकिर्दीत प्रथमच पाच तासांच्यावरचा सामना खेळला. 

टेनिसमध्ये सर्वांत प्रदीर्घ सामन्याचा विक्रम 11 तास 5 मिनिटांचा आहे. विम्बल्डन 2010 च्या पहिल्या फेरीच्या या सामन्यात तब्बल तीन दिवस खेळ चालला आणि त्यात अमेरिकेच्या जॉन इस्नर याने  फ्रान्सच्या निकोलस माहुत याला 6-4, 3-6, 6-7, 7-6, 70-68  अशी मात दिली होती. 

फ्रेंच ओपनमधील प्रदीर्घ सामने 1) 6 तास 33 मिनिटे- 2004- पहिली फेरी फॅब्रिस सांतारो वि.वि. अर्नाड क्लेमेंट 6-4, 6-3, 6-7, 3-6, 16-14  2) 5 तास 41 मिनिटे- 2012- दुसरी फेरी  पॉल हेन्री मॅथ्यू वि.वि. जॉन इसनर  6-7, 6-4, 6-4, 3-6, 18-16  3) 5 तास 31 मिनिटे- 1998- तिसरी फेरी अॅलेक्स कॉरेत्जा वि. हर्नन गुमी 6-1, 5-7, 6-7, 7-5, 9-7 4) 5 तास 9 मिनिटे- 2019- चौथी फेरी स्टान वॉवरिंका वि.वि. स्टेफानोस सीसीपास 7-6(6), 5-7, 6-4, 3-6, 8-6 

टॅग्स :Tennisटेनिस