सेरेना विल्यम्सचा असा पराभव कधी झाला नव्हता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 15:04 IST2018-08-01T15:02:50+5:302018-08-01T15:04:52+5:30
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला कारकिर्दीत प्रथमच सर्वात वाईट पराभवाचा सामना करावा लागला.

सेरेना विल्यम्सचा असा पराभव कधी झाला नव्हता
नवी दिल्ली - जागतिक क्रमवारीवर कधीकाळी अव्वल स्थानावर विराजमान असलेली आणि 23 ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला कारकिर्दीत प्रथमच सर्वात वाईट पराभवाचा सामना करावा लागला. सिलिकॉन व्हॅली क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत ब्रिटनच्या जोहाना कोंटाकडून तिला सरळ सेटमध्ये हार मानावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन स्पर्धेनंतर सेरेनाची ही पहिलीच स्पर्धा होती.
मंगळवारी झालेल्या सामन्यात कोंटाने 6-1, 6-0 अशा सरळ सेटमध्ये सेरेनावर विजय मिळवला. 2012पर्यंत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलेल्या कोंटाने तीन डब्लूटीए टूर स्पर्धा जिंकल्या आहेत. कोंटाविरूद्धच्या या लढतीत सेरेनाला संघर्ष करावा लागला. अवघ्या 51 मिनिटांत कोंटाने बाजी मारली.
.@JohannaKonta stuns Serena Williams, 6-1, 6-0!
— WTA (@WTA) August 1, 2018
Takes 12 games in a row to move into @MubadalaSVC second round! pic.twitter.com/MtZY0Bkos4
विम्बल्डन स्पर्धेत कोंटाला दुस-याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. 2016 मध्ये कोंटाने पहिला डब्लूटीए किताब जिंकला होता. त्यावेळी कोंटाने विनस विल्यम्सला पराभूत केले होते.