'तो' पोशाख घातल्यास सेरेना विल्यम्सवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 12:57 IST2018-08-25T12:57:11+5:302018-08-25T12:57:31+5:30

अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सला फ्रेंच ओपन स्पर्धेत 'ब्लॅक कॅट' सुट घालता येणार नाही.

Serena Williams is banned if she is wearing ' | 'तो' पोशाख घातल्यास सेरेना विल्यम्सवर बंदी

'तो' पोशाख घातल्यास सेरेना विल्यम्सवर बंदी

लंडन - अमेरिकेची स्टार टेनिसपटूसेरेना विल्यम्सला फ्रेंच ओपन स्पर्धेत 'ब्लॅक कॅट' सुट घालता येणार नाही. आयोजकांनी या स्पर्धेसाठी नवा ड्रेस कोड जाहीर केला आहे आणि त्यामुळे सेरेनाला तो सुट घातला येणार नाही. तरीही तिने तो घातल्यास तिच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते. 

फ्रान्स टेनिस महासंघाचे अध्यक्ष बर्नाड गियुडिसेलीने सांगितले की,'यापुढे असे काही चालणार नाही. तुम्हाला खेळ आणि या ठिकाणाचा आदर राखलाच पाहिजे.' मात्र, त्यांनी बदललेल्या नियमांबद्दल काहीच माहिती दिली नाही. 

फ्रेंच स्पर्धेत सेरेनाच्या या ब्लॅक सुटचीच अधिक चर्चा झाली होती. ब्लॅक पँथर्स या सुपरहिट चित्रपटातून प्रेरणा घेत सेरेनाने हा सुट घातला होता. 

Web Title: Serena Williams is banned if she is wearing '