शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

सेरेना, ओसाका ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 07:56 IST

Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपन २०२०चा उपविजेता आणि यूएस ओपन चॅम्पियन डोमिनिक थीमला ग्रिगोर दिमत्रोव्हविरुद्ध ६-४, ६-४, ६-० ने पराभव स्वीकारावा लागला.

मेलबर्न : सेरेना विल्यम्स आणि नाओमी ओसाका यांनी रविवारी येथे निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतींमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या दोघींनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष विभागात मात्र डोमिनिक थीमचे आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले.ऑस्ट्रेलियन ओपन २०२०चा उपविजेता आणि यूएस ओपन चॅम्पियन डोमिनिक थीमला ग्रिगोर दिमत्रोव्हविरुद्ध ६-४, ६-४, ६-० ने पराभव स्वीकारावा लागला.सेरेनाने सातव्या मानांकन प्राप्त आर्यना सबालेंका हिला ६-४,२-६, ६-४ असे पराभूत केले. सेरेना हिने आपल्या विक्रमी २४व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाच्या आशा कायम राखल्या. तिने आपले अखेरचे ग्रॅण्डस्लॅम २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनमध्येच जिंकले होते. सेरेनाचा हा कोणत्याही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील ६२वा सामना होता, तर सबालेंका या फेरीतील केवळ दुसरा सामना खेळत होती. त्या दोघींमध्ये चांगलीच लढत रंगली होती. मात्र अखेरीस अनुभवी सेरेनाने विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत सेरेनाचा सामना सिमोना हालेप आणि इगा स्वितेक यांच्यातील विजेतीसोबत होणार आहे.त्याआधी नाओमी ओसाका हिने दोन मॅच पॉइंट वाचवत पुनरागमन केले आणि गर्बाईन मुगुरुजावर ४-६, ६-४, ७-५ने मात केली. तिने अखेरीस चार गेम जिंकत शानदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये २०१९ची विजेती ओसाका हिने अखेरच्या ५-३च्या स्कोअरवरून १५-४० अशी मागे होती. मुगुरूजाकडे दोन मॅच पॉइंट होते. मात्र त्याचा फायदा घेण्यात ती अपयशी ठरली. ओसाकाची लढत आता तैवानची ३५ वर्षांची सी सु वेईसोबत होणार आहे. बिगर मानांकित सी सु वेईने २०१९च्या फ्रेंच ओनपची फायनलिस्ट मार्केटा वांड्रोसोवाला     ६-४, ६-२ असे पराभूत केले. तिने पहिल्यांदाच कोणत्याही ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. ती ओपन युगात ग्रॅण्डस्लॅम उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी सर्वात वयस्कर खेळाडू ठरली आहे.

- पुरुषांच्या गटात रशियाचा क्वालिफायर असलान करासेव याने २०व्या मानांकन प्राप्त फेलिक्स आगुर अलिसामीला३-६, १-६,६-३,६-३,६-४ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. - १९९६ नंतर पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने ग्रॅण्डस्लॅम पदार्पण करताना अंतिम आठमध्ये जागा बनवली. याआधी ॲलेक्स रादुलेस्कु यांनी १९९६च्या विम्बल्डन स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन