शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भारतीय टेनिस विश्वाची ‘सोने की चिडीयाँ’, तब्बल दोन दशके बहरली सानियाची कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 06:33 IST

Sania Mirza: महिला टेनिसपटूंचा कुठलाही इतिहास नसलेल्या भारतासारख्या देशाला सानियाने मिळवून दिलेले यश सोन्यासारखे होते

- अयाज मेमन(कन्सल्टिंग एडिटर)

आपल्या देदीप्यमान कारकिर्दीचा शेवट ग्रँडस्लॅम विजयाने करण्यात भारतीय दिग्गज सानिया मिर्झाला अपयश आले. ऑस्ट्रेलियन ओपनमधील मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया-बोपन्ना या भारतीय जोडीला ब्राझीलच्या राफेल माटोस आणि लुइसा टेफानी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. निश्चितपणे हा पराभव सानियाच्या जिव्हारी लागला असेल. पण म्हणून तिची महानता कमी होत नाही. महिला टेनिसपटूंचा कुठलाही इतिहास नसलेल्या भारतासारख्या देशाला सानियाने मिळवून दिलेले यश सोन्यासारखे होते. 

रूढी-परंपरांना भेदण्याचे होते आव्हानसमाजाच्या जुनाट प्रथांना आणि रूढी-परंपरावादी मानसिकतेला भेदणे महिला क्रीडापटूंसमोर मोठे आव्हान असते. अशावेळी कुटुंब, मित्र, प्रायोजक आणि संघटनेकडून महिला खेळाडूंनी जरी समर्थन मिळाले. तरीसुद्धा लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दृढनिश्चय असावा लागतो. इतक्या सगळ्या दडपणात काहीच महिला खेळाडू यशस्वी ठरतात. सानिया मिर्झा त्यापैकीच एक. कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक संकटांना तिने तोंड दिले. दुर्दैवाने त्यात मैदानाबाहेरील गोष्टी जास्त होत्या. पण ती थांबली नाही. सतत येणाऱ्या अडथळ्यांना यशस्वीपणे पार केल्यामुळेच ती मोठी कारकीर्द घडवू शकली. 

सहा ग्रँडस्लॅम किताब आणि इतर अनेक स्पर्धांचे विजेतेपद सानियाच्या विजिगीषू वृत्तीची, तिच्यात असलेल्या अफाट ऊर्जेची प्रचिती देतात. लिएंडर पेस (१४) आणि महेश भूपती (१२) या भारतीय टेनिसपटूंनी तिच्यापेक्षा जास्त ग्रँडस्लॅम जिंकलेले आहेत. पण या सर्वांपेक्षा सानियाचा संघर्ष मोठा होता. मैदान गाजविण्याआधी मैदानावर पोहोचण्यासाठी तिला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली होती.

यांचाही होता जलवा संघर्षपूर्ण कारकीर्द घडविणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये सानिया मिर्झा ही काही एकमेव नाही. तिच्या आधीही अनेक महिला खेळाडूंना सामाजिक बेड्या तोडाव्या लागल्या. यामध्ये पी. टी. उषा, मेरी कोम, सायना, सिंधू, ज्वाला गुट्टा, राणी रामपाल, मिताली राज, फोगाट बहिणी, साक्षी मलिक आणि निखत झरीनसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यातल्या प्रत्येकीचा संघर्ष त्यांच्या दृष्टीने मोठाच होता. दुर्दैम्य आशावादामुळेच या सगळ्या येथवर पोहोचल्या. ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वाची धनी असलेल्या सानियाने कुठल्याच गोष्टीचा दिखावा केला नाही. जे होतं ते स्वत:च्या हिमतीवर. त्यामुळे मनाला पटेल त्या गोष्टी सानिया आयुष्यभर करत राहिली. याच गोष्टी तिला टेनिस कारकिर्दीचा उत्कर्ष साधण्यासाठी उपयोगाच्या ठरल्या.

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाTennisटेनिसIndiaभारत