Video : शोएब मलिकच्या एका सवयीचा सानिया मिर्झाला येतो प्रचंड राग  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 01:29 PM2020-05-23T13:29:15+5:302020-05-23T13:29:45+5:30

सानिया-शोएब यांच्या विवाहाला अनेकांचा होता विरोध..

Sania Mirza reveals one habit of husband Shoaib Malik which irritates her the most svg | Video : शोएब मलिकच्या एका सवयीचा सानिया मिर्झाला येतो प्रचंड राग  

Video : शोएब मलिकच्या एका सवयीचा सानिया मिर्झाला येतो प्रचंड राग  

Next

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानच माजी कर्णधार शोएब मलिक ही नेहमी चर्चेत राहणारी जोडी... सानियानं पाकिस्तानी क्रिकेटपटूशी केलेलं लग्न अनेकांना पटलेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या लग्नाला विरोधही झाला. पण, आज सर्व विरोध पचवून या दोघांनी सुखी संसार करून दाखवला. या दोघांना इझान नावाचा मुलगाही आहे. पण, शोएबच्या एका गोष्टीचा प्रचंड राग येत असल्याचा खुलासा सानियानं केला आहे.   

सानियानं नुकतंच पाकिस्तानची क्रीडा पत्रकार झैनाब अब्बास हिच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या गप्पांचा व्हिडीओ शोएबनं पोस्ट केला. त्यात त्यानं सानियानं खुलासा केला.

सानियानं सांगितलं की,''आम्ही जेव्हा गप्पा मारतो, तेव्हा शोएब जास्त बोलत नाही. विशेषतः आम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीवर वाद किंवा तत्सम चर्चा करतानाही तो काहीच बोलत नाही. त्याला बोलतं करण्यासाठी मला वस्तूंची तोडफोड करावासं वाटतं.''

सानिया पुढे म्हणाली मला सतत बडबड करायला आवडते, परंतु शोएब त्याच्या परस्पर विरोधी आहे. त्याला फार बोलायला आवडत नाही आणि तेच मला आवडत नाही. ''मला सतत गप्पा मारायला आवडतात आणि शोएब त्याउलट आहे. तो त्याच्या फोनकडे पाहत असतो आणि मी बडबड करत असते. मला ते आवडत नाही,''असे सानिया म्हणाली.

यावेळी तिची एक सवय शोएबलाही आवडत नसल्याचं, सानियाने सांगितली. ''मी अधीर आहे आणि कदाचित ही गोष्ट त्याला आवडत नसावी,''असं ती म्हणाली. सानियाला तुझं पहिलं क्रश काय, असं विचारलं असता तिनं लगेच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं नाव घेतलं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक!

15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन

इरफान पठाणनं मुस्लीम बांधवांना केलं आवाहन; पाहा Video

सौरव गांगुली अन् जय शाह यांच्यासाठी घटनाबदल; BCCIची सर्वोच्च न्यायालयात धाव

शाहिद आफ्रिदीनं दिली घटनास्थळी भेट, पाकिस्तानी फॅन्सनी घेतला समाचार

 

 

Web Title: Sania Mirza reveals one habit of husband Shoaib Malik which irritates her the most svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app